News Flash

तेहलका प्रकरण: तेजपालचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला

तेहलकाचा संस्थापक संपादक तरुण तेजपाल याला जामीन देण्यास आता सर्वोच्च न्यायालयानेही नकार दिला आहे. उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर तेजपालने सर्वोच्च न्यायालयानेच दरवाजे ठोठावले होते

| April 21, 2014 12:59 pm

तेहलकाचा संस्थापक संपादक तरुण तेजपाल याला जामीन देण्यास आता सर्वोच्च न्यायालयानेही नकार दिला आहे. उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर तेजपालने सर्वोच्च न्यायालयानेच दरवाजे ठोठावले होते. तेजपालच्या वतीने न्यायालयात सादर करण्यात आलेल्या ५०० पानी जामीन अर्जावर सुनावणी देताना सर्वोच्च न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला असून गोवा पोलिसांना तेजपाल यांच्या जामीन अर्जावर अहवाल देण्यास सांगितले आहे.
येत्या चार आठवड्यांत गोवा पोलिसांनी तेजपालच्या जामीनावर अहवाल सादर करावा असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. शोमा चौधरी यांच्या सांगण्यावरून पीडित महिलेकडे तेजपालने माफी मागितली हा पुरावा म्हणून आपल्याविरुद्ध नोंद केलेल्या गुन्ह्यात वापरण्यात येत असल्याचे जामीन अर्जात नमूद करण्यात आले होते. यावरून न्यायालयाने गोवा पोलिसांना अर्जावर सविस्तर अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2014 12:59 pm

Web Title: supreme court issues notice to goa police on tejpals bail plea in sexual assault case
टॅग : Tarun Tejpal
Next Stories
1 नरेंद्र मोदींच्या अर्जावर स्वाक्षरी करण्यास खॉं कुटुंबियांचा नकार
2 केजरीवाल आणि कुमार विश्वास यांच्याविरुद्ध गुन्हा
3 जम्मू-काश्मीरला ३७० व्या कलमाचा कोणता फायदा झाला – राजनाथ सिंह
Just Now!
X