चंदनतस्कर वीरप्पन याच्या चार साथीदारांच्या फाशीच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारपर्यंत स्थगिती दिली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या चारही साथीदारांचा दयेचा अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांना फाशी द्यावी, असा आदेश गृह मंत्रालयाने काढला. 
फाशीच्या अंमलबजावणीला स्थगिती द्यावी, यासाठी चारही दोषींच्यावतीने मानवी हक्कांसंदर्भात काम करणाऱया कार्यकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात शनिवारी याचिका दाखल केली. मात्र, न्यायालयाने तातडीने त्यावर निर्णय देण्यास नकार दिला होता. सोमवारी न्यायालयाने फाशीच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली. कर्नाटकमध्ये १९९३ घडविण्यात आलेल्या भूसुरूंग स्फोटात २२ पोलिस मृत्युमुखी पडले होते. या प्रकरणातील दोषीं गणप्रकाश, सिमॉन, मीसेकर मदाय, बिलवेंद्रन यांना सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती.