भारतात ‘स्वच्छ भारत मोहिमे’ला तीन वर्षांपूर्वी सुरूवात झाली. यानंतर २०१४ च्या तुलनेत मागील तीन वर्षांत स्वच्छतेबाबत लोकांमध्ये सजगता वाढली आहे की नाही? या संदर्भात एका सोशल नेटवर्किंग वेबसाईटने  सर्वेक्षण केले. ज्या सर्वेक्षणानंतर लोक काशी अंशी सजग  झाले असल्याचे समोर आले. ‘LocalCircles’ या वेबसाईटने त्यांच्या सर्वेक्षणात स्वच्छ भारत मोहिमेबाबत आणि स्वच्छतेबाबत काही प्रश्न विचारले.  ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

स्वच्छ भारत अभियानाबाबत काय प्रश्न विचारण्यात आले?

11th class, seats vacant,
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत प्रचंड प्रमाणात जागा रिक्त राहिल्याचे उघडकीस, झाले काय?
What are the reasons for increase in average life expectancy of Indians
भारतीयांचे सरासरी आयुर्मान वाढतेय… कारणे कोणती?
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?

तुमचे शेजार आणि शहर २०१४ च्या तुलनेत स्वच्छ झाले आहे असे वाटते का? या प्रश्नाला ४४ टक्के लोकांनी नाही असे उत्तर दिले आहे. तर काही प्रमाणात परिस्थिती सुधारली असे ९ टक्के लोकांनी म्हटले, २०१४ च्या तुलनेत चांगली स्थिती आहे असे १८ टक्के लोकांना वाटते आहे. तर परिस्थिती किंचित बदलली असे २९ टक्के लोकांना वाटते आहे.

सार्वजनिक स्वच्छतागृहांमधील स्वच्छता तीन वर्षांमध्ये सुधारली असे वाटते का? या प्रश्नाला ७२ टक्के लोकांनी नाही असे उत्तर दिले आहे, तर १० टक्के लोकांनी सांगता येत नाही अशी भूमिका मांडली आहे. तर १८ टक्के लोकांना वाटतेय की आधीच्या तुलनेत अवस्था सुधारली.

महानगरपालिका स्वच्छतेबाबत अधिक जागरुक झाल्या आहेत असे वाटते का? असाही प्रश्न या सर्वेक्षणात विचारला गेला. २२ टक्के लोकांनी याचे उत्तर होय असे दिले आहे. तर ७१ टक्के लोक काहीही सुधारणा झाल्या नसल्याचे म्हणत आहेत. ७ टक्के लोकांनी या प्रश्नाबाबत काहीही उत्तर दिले नाही.

आपली सामाजिक जबाबदारी तीन वर्षात सुधारली आहे असे वाटते का? या प्रश्नाला ३२ टक्के लोकांनी होय असे उत्तर दिले आहे. तर ६२ टक्के लोकांनी नाही असे उत्तर दिले आहे. उर्वरित ६ टक्के लोकांनी त्यांची भूमिका मांडता येत नसल्याचे म्हटले आहे.

स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण होण्यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न होत आहेत का? या प्रश्नाला १६ टक्के लोकांनी होय असे उत्तर दिले तर ७८ टक्के लोकांनी नाही असे उत्तर दिले. उर्वरित ६ टक्के लोकांनी भूमिका मांडता येत नसल्याचे म्हटले आहे.

प्लास्टिक, डेब्रिज आणि इतर कचऱ्याचे विघटन नियोजित जागेवर केले जात नाही असे वाटते का? या प्रश्नाचे उत्तर ९० टक्के लोकांनी हो असे दिले आहे. तर ७ टक्के लोकांनी नाही असे दिले आहे. ३ टक्के लोकांनी यावर भूमिकाच घेतलेली नाही.

लहान मुलांमध्ये स्वच्छ भारत अभियानाबाबत सजगता निर्माण झालीये का? या प्रश्नाचे उत्तर ३२ टक्के लोकांनी होय असे दिले तर ६२ टक्के लोकांनी नाही असे दिले. ६ टक्के लोकांनी या प्रश्नाबाबत काहीही भूमिका मांडलेली नाही.

स्वच्छ भारत मोहिम ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोशात सुरु केली. त्याचा परिणाम काही अंशी दिसतो आहे असे या सर्वेक्षणानुसार समोर आले आहे. मात्र स्वच्छतेबाबतची सजगता लोकांमध्ये आणखी वाढण्याची गरज आहे हे वास्तवही नाकारता येणार नाही.