कोरोना व्हायरस साथीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्गाला आधार देण्यासाठी महिंद्रा कंपनीची भाग असलेली ‘स्वराज’ पुढे आली आहे. २०.७ अब्ज डॉलर्सची उलाढाल असलेल्या महिंद्रा समूहाचा एक भाग आहे. कापणीच्या हंगामात ‘स्वराज’ कंपनी शेतकऱ्यांना अतिरिक्त (स्टॅंडबाय) ट्रॅक्टर देणार आहे. यामुळे सध्याच्या कठीण काळात शेतकऱ्यांना मदत होईल. कंपनीने आपल्या ‘आपके साथ है आपका स्वराज’ अभियानांतर्गत असे अनेक उपक्रम सुरू केले आहेत.

‘सॉलिड भरोसा’ या आपल्या आश्वासनाची पूर्तता करीत स्वराज ‘कॉल सेंटर’द्वारे ग्राहकांना ही सुविधा २४ तास देत आहे. सेवा आणि स्पेअर पार्ट्सशी संबंधित माहितीसाठी ग्राहक 18004250735 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतात. या गंभीर परिस्थितीत ‘स्वराज’चे सर्व विक्रेते आणि सेवा पथके हेदेखील शेतकर्‍यांना फक्त एक फोन कॉलवर मदत करतील.

कापणीचा हंगाम हा शेतकर्‍यांसाठी अत्यंत धावपळीचा व कठीण काळ असतो. सध्याच्या साथीच्या आजारामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टरबाबत कोणतीही अडचण येऊ नये, अशी स्वराज कंपनीची इच्छा होती आणि म्हणूनच कंपनीने ही योजना सुरू केली. नेहमीप्रमाणे स्वराज ही ग्राहक केंद्रीत संघटना म्हणून शेतकऱ्यांच्या पाठिशी उभी राहील.

याव्यतिरिक्त, स्वराज कंपनीची ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ (सीएसआर) शाखा वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व सामान्य नागरिकांच्या सहाय्यासाठी निरनिराळ्या उपक्रमांमध्ये सतत गुंतलेली असते. चंडीगडमधील पीजीआयएमआर आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय येथे कंपनीने मास्क, सॅनिटायझर्स, ईसीजी मशीन, तसेच डॉक्टर आणि निमवैद्यकीय कर्मचार्‍यांसाठी संरक्षक सूट्स दान केले आहेत. त्याचबरोबर, मोहाली जिल्ह्यातील गरजूंना गहू, आटा आणि तांदूळ यासह किराणा मालाच्या आवश्यक वस्तूंचे वाटपही कंपनीतर्फे करण्यात आले आहे.