भारताची ओळख असलेला संगमरवरी मकबरा ‘ताजमहाल’ हे युनेस्कोचे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सवरेत्कृष्ट जागतिक वारसा स्थळ (वर्ल्ड हेरिटेज साइट) असल्याचे एका ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टलने म्हटले आहे.

मोगल सम्राट शाहजहान याने त्याची पत्नी मुमताज महल हिच्या स्मरणार्थ बांधलेला आणि दरवर्षी ८० लाखांहून अधिक पर्यटक भेट देत असलेला ताजमहाल याचे स्थान कंबोडियाच्या अंकोर वॅट मंदिरानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशी आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांची मते आणि त्यांनी दिलेली क्रमवारी यांच्या आधारे ‘ट्रिप अ‍ॅडव्हायझर’ने जगभरातून युनेस्कोच्या सवरेत्कृष्ट सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा स्थळांची यादी प्रसिद्ध केली आहे.

candidates chess gukesh takes sole lead by beating alireza firouzja
गुकेशचे अग्रस्थान भक्कम; नेपोम्नियाशी, नाकामुरा, कारुआना संयुक्त दुसऱ्या स्थानी; अखेरची फेरी शिल्लक 
international monetary fund praises india for maintaining fiscal discipline in election year
निवडणूक वर्षातही भारताकडून वित्तीय शिस्त कायम; आंतरराष्ट्रीय़ नाणेनिधीकडून कौतुक; आघाडीच्या देशांमध्ये स्थान कायम राहणार
Pune model of co-working space From start-ups to large companies everyone is getting preference
को- वर्किंग स्पेसचे पुणेरी मॉडेल! स्टार्टअपपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांचीच मिळतेय पसंती
Yamaha introduces vibrant new color options across the MT15 V2 Fascino and Ray ZR portfolios Know Features And price
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह यामाहा इंडियाने ‘या’ दुचाकींना केलं उपडेट; पाहा कलर ऑप्शन…

या यादीतील सर्वात लोकप्रिय वारसा स्थळांमध्ये चीनच्या उत्तरेकडील क्वी राजघराण्याच्या झु डा याने ख्रिस्तपूर्व १३६८ साली बांधलेल्या चीनच्या महाकाय भिंतीचा समावेश आहे. दक्षिण अमेरिकेच्या पेरू देशातील माचु पिचुने यादीत चौथा क्रमांक मिळवला आहे. याशिवाय ब्राझीलमधील इगुआझु राष्ट्रीय उद्यान, इटलीतील ‘सासी ऑप मटेरा’, पोलंडमधील ऐतिहासिक क्रकॉओ, इस्रायलमधील जेरुसलेम हे पुरातन शहर आणि तुर्कस्तानमधील इस्तंबुलची ऐतिहासिक ठिकाणे यांचाही यादीत समावेश आहे.