पाकिस्तानने केलेल्या मदतीमुळेच अफगाणिस्तानात तालिबानचा विजय झाला असा आरोप अमेरिकी सेनेटर मार्को रुबियो यांनी केला आहे. अफगाणिस्तान विषयक काँग्रेसच्या सुनावणीत त्यांनी गुरुवारी सांगितले, की अफगाणिस्तानातील घटनाक्रम ज्या पद्धतीने उघड होत गेला त्यामुळे त्यात पाकिस्तानचा हात स्पष्ट दिसत आहे. त्यातून भारताला चांगला संदेश गेलेला नाही असेही ते म्हणाले.

पाकिस्तानसारखा देश अफगाणिस्तानात तालिबानचा विजय घडवून आणतो ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे आपण भयानक परिस्थितीत सापडलो आहोत असे रुबियो यांनी म्हटले आहे. पाकिस्तानने तालिबानला सुरक्षित आश्रय दिला. त्यांनी दहशतवाद्यांची भरती व प्रशिक्षण यात भूमिका पार पाडली आहे, अशी टीका रुबियो यांनी केली.