06 July 2020

News Flash

चर्चेसाठी पाकचे निमंत्रण स्वीकारणे परिस्थितीवर अवलंबून – सलमान खुर्शीद

पाकिस्तानच्या चर्चा निमंत्रणावर भारताने प्रतिक्रिया देण्यात काळजी बाळगली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे चर्चा निमंत्रण स्विकारणे परिस्थितीवर अवलंबून आहे आणि याचा काळजीपूर्वक विचार करणे

| February 7, 2014 01:10 am

पाकिस्तानच्या चर्चा निमंत्रणावर भारताने प्रतिक्रिया देण्यात काळजी बाळगली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे चर्चा निमंत्रण स्विकारणे परिस्थितीवर अवलंबून आहे आणि याचा काळजीपूर्वक विचार करणे गरजेचे असल्याचे भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री सलमान खुर्शीद यांनी म्हटले आहे.
तालिबान्यांसमवेत बोलणी करण्यासाठी लोकप्रतिनिधींचे मत घेणार-नवाझ शरीफ
सलमान खुर्शीद म्हणतात, पाकिस्तानने चर्चा निमंत्रण पंतप्रधान मनमोहन सिंग यांना जाणे गरजेचे आहे. यावर पंतप्रधान आपले मत सांगतील आणि त्यानंतर हे सर्वस्वी परिस्थितीवर अवलंबून आहे की ज्याचा विचारपूर्वक अभ्यास करणे गरजेचे आहे.
पाकिस्तान पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी बुधवारी काश्मीर प्रश्नी भारताशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली. सर्वसमावेशक, परिणामी आणि चांगले संबंध टिकून राहण्यासाठीच्या चर्चेसाठी भारताला निमंत्रित करू इच्छितो असे नवाझ शरीफ यांनी पाकिस्तानातील कार्यक्रमात म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना सलमान खुर्शीद यांनी पाकिस्तानने प्रथम भारताच्या पंतप्रधानांना त्याबद्दलचे निमंत्रण पाठविणे गरजेचे आहे. पंतप्रधानांच्या मतानंतर पाकिस्तानचे चर्चा निमंत्रण स्विकारणे हे परिस्थितीवर अवंलबून राहील असे म्हटले आहे.
भारताशी सौहार्दपूर्ण संबंध राखू – नवाझ शरीफ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2014 1:10 am

Web Title: talks with pak will depend on circumstances khurshid
Next Stories
1 अधिवेशनाचे कामकाज पहिल्याच दिवशी ठप्प
2 काश्मीर मुद्दय़ावर चर्चेसाठी भारताला पाकचे आमंत्रण
3 ब्ल्यू स्टार कारवाईत ब्रिटनच्या सहभागाचा पुरावा नाही-कॅमेरून
Just Now!
X