तामिळनाडूत अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये लैंगिक छळ केल्याच्या तक्रारी येत असतात. दरम्यान रामनाथपुरम जिल्ह्यातील मुदुकुलाथूर येथील सरकारी अनुदानित शाळेतील आणखी एक घटना समोर आले आहे. एका विद्यार्थिनीच्या तक्रारीच्या आधारे एका शिक्षकास अटक करण्यात आली आहे.

शाळेत विज्ञान शिक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकाने कोचिंग देण्याच्या बहाण्याने एका विद्यार्थिनीचा मोबाइल नंबर घेतला. त्यानंतर त्याने चुकीच्या पद्धतीने कॉल करणे व बोलणे सुरू केले, असे तक्ररादाराने सांगितले आहे. तसेच शिक्षकाने विद्यार्थिनीला खास क्लासेससाठी त्याच्या घरी येण्यास सांगितले. यावेळी शिक्षकाने तिला घरी येण्यास नकार दिल्यास नापास करण्याची धमकी दिली होती.

ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल

शिक्षकाने विद्यार्थिनीला कॉल केल्यानंतरची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ऑडिओमध्ये यापुर्वी सुद्धा बऱ्याच विद्यार्थिनींनी हे केले असल्याचे शिक्षक बोलत आहे. तसेच शिक्षकाने इतर अनेक विद्यार्थिनींची नावे घेऊन चुकीच्या टिप्पण्या केल्या. यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांना मोठा धक्का बसला असून त्यांच्यात संताप पसरला आहे.

हेही वाचा- मॅट्रिमोनिअल साईटवरुन १२ उच्चशिक्षित महिलांना जाळ्यात ओढून लैंगिक शोषण; भामट्याला मुंबईत अटक

दरम्यान, मुधुकुलाथूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे आणि प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्सुअल ऑफेंस (POCSO) या कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधीक तपास करत आहेत. दरम्यान, तामिळनाडू सरकारने लैंगिक हिंसाचारापासून विद्यार्थ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी शाळांसाठी सल्लागार पॅनेल, ड्रेस कोड आणि सेफ्टी ऑडिट यासारख्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.