ओडिशातील जाजपूर येथे दहा कापलेले हात सापडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. रविवारी हा धक्कादायक प्रकार समोर आला. 2006 मध्ये या परिसरात एका प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या आदिवासींवर पोलिसांनी गोळीबार केला होता, त्यांचेच हे हात असावेत असा अंदाज प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना समोर आल्यानंतर जाजपूर येथे भीतीचे वातावरण असून परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2006 मध्ये कलिंगा नगरमधील स्टिल कारखान्यासाठीच्या जमिन अधिग्रहणाला स्थानिक आदिवासींनी विरोध केला होता आणि त्याविरोधात आंदोलन केलं होतं. त्यावेळी आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी गोळीबार केला होता. त्यात 13 पेक्षा जास्त आदिवासींचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मृतांचं शवविच्छेदन करण्यात आलं, पण पाच मृतदेहांची ओळख पटली नव्हती. ओळख न पटल्याने त्यांचे हात कापून त्यांच्या बोटांचे ठसे घेण्यात आले होते. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आदिवासींच्या कुटुंबियांना मृतदेहांचे हात परत देण्यात आले. मात्र, त्यांनी ते स्वीकारण्यास नकार दिला आणि या हातांची डीएनए चाचणी करण्याची मागणी केली होती.

Relief for flood affected Chirner due to works started before monsoon
पावसाळ्यापूर्वी सुरू झालेल्या कामांमुळे पूरग्रस्त चिरनेरला दिलासा?
CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी
Dried pods of opium, Dhule, opium Dhule,
धुळे : लसूण भरलेल्या मालमोटारीत हे काय… पोलीसही चकित
Tiger from sanctuary missing after collar falls off Nagpur
‘कॉलर’ गळून पडल्याने अभयारण्यातील वाघीण ‘बेपत्ता’

दरम्यान, हे हात एका मेडिकल बॉक्समध्ये ठेवण्यात आले होते. या प्रकरणी एफआयआर दाखल झालेला नाही. ज्या क्लबमधील मेडिकल बॉक्समध्ये हे हात ठेवण्यात आले होते, त्या क्लबची खिडकी शनिवारी रात्री काही अज्ञातांनी तोडली आणि मेडिकल बॉक्स पळवला. त्यानंतर जाजपूर येथे त्यांनी हा बॉक्स फेकला अशी माहिती एसपी सी. एस. मीना यांनी दिली.