– करोना व्हायरसच्या संकटावर मात करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आणि लोकांनी एकत्र काम केले पाहिजे तरच या संकटावर मात करणं शक्य आहे.

– लॉकाडाउन हे करोना व्हायरसवर औषध नाही, लॉकडाउन संपल्यानंतर पुन्हा व्हायरस डोकं वर काढणार, लॉकडाउन फक्त काही वेळासाठी व्हायरसला रोखतो, करोना चाचण्या हा व्हायरसला रोखण्याचा एकमेव मार्ग आहे. त्यातून आपल्याला व्हायरसचा प्रवास कुठल्या दिशेला चालू आहे ते समजतं.

– लॉकडाउन पॉज बटनासारखा आहे. हा कायमस्वरुपी तोडगा नाही. लॉकडाउन संपल्यानंतर व्हायरस पुन्हा फैलावणार. लॉकडाउनच्या काळात आपल्याला व्हायरस विरोधात लढण्यासाठी तयारी करण्याचा वेळ मिळतो. दहा लाख लोकसंख्येमागे १९९ हा आपला चाचणीचा वेग पुरेसा नाही. आपल्याला चाचणीचा वेग वाढवण्याची आवश्यकता आहे.

– आपण साठवलेलं धान्य लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांच्यापर्यंतही धान्य पोहोचलं पाहिजे. आपल्याकडे अधिकचं धान्य साठवलं आहे. आता पुन्हा तो साठा वाढेल. त्यामुळे धान्य गरजूंपर्यंत पोहोचलं पाहिजे. १० किलो तांदूळ, १० किलो गहू, १ किलो डाळ, १ किलो साखर दर आठवड्याला गरजुंना सरकारनं द्यावी, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.

– करोनामुळे देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. मात्र यानंतर आधीच बेरोजगारीच्या संकटाशी झगडणाऱ्या आपल्या देशाला याच बेरोजगारीच्या आणखी मोठ्या समस्येचा सामना करावा लागणार आहे. त्यासाठी केंद्राने पॅकेज जाहीर करावं. छोटया मध्यम उद्योगांच्या सुरक्षेसाठी पॅकेज तयार करा अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.

– करोनाचा विषाणू नियंत्रित होत नाही, त्याचे व्यवस्थापन करावे लागते. लॉकडाउन ठेवायचा की, नाही हे मुख्यमंत्र्यांना ठरवूं दे. तुम्ही एखादा विभाग सुरु केल्यानंतर चाचण्या पुरेशा प्रमाणात झाल्या नसतील तर व्हायरसच्या फैलावामुळे पुन्हा लॉकडाउन करावे लागेल.

– करोना विरुद्ध आता लढाई सुरु झाली आहे. आताच विजय मिळवला हे जाहीर करणे चुकीचे ठरेल. आपल्याला दीर्घकाळ लढाई लढावी लागणार आहे.

– नरेंद्र मोदींबरोबर अनेक मुद्दांवर माझे मतभेद आहेत. पण आज मोदींवर टीका करण्याची वेळ नाही. देशाला एकत्र करुन करोना व्हायरसविरोधात लढण्याची वेळ आहे. आपण एकत्र राहिलो तर करोना व्हायरसला पराभूत करु शकतो आणि भारत खूप पुढे निघून जाईल.

– टेस्टिंगमुळे कोणाचे नुकसान होणार नाही. त्यामुळे मोठया प्रमाणावर टेस्टिंग करणे आवश्यक आहे. करोनाशी लढायचे असेल तर देशाला एकत्र झाले पाहिजे. आपण आपसात लढाई सुरु केली तर आपण करोना विरुद्धच्या लढाईत कमकुवत पडणार.

– लोक घरामध्ये बंद आहेत. बेरोजगारीचे संकट आहे. पण तुम्ही चिंता करु नका, कुठल्याही आजारापेक्षा भारत मोठा देश आहे. आपण या व्हायरसला पराभूत करु शकतो. विरोधी पक्षात असलो तरी माझा सरकारला पाठिंबा आहे. आम्ही सरकारला सकारात्मक सल्ले देणार.