वृत्तसंस्था, कॉक्स बाजार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्याच्या विरोधात झालेल्या आंदोलनात १० जण ठार झाले असून मोदी मायदेशी परतल्यानंतर हे आंदोलन अधिक हिंसक झाले. हिंदूंच्या मंदिरावर हल्ला करण्यात आला. यासंदर्भात रॉयटर्स या वृत्तसंस्थेने पोलीस आणि स्थानिक पत्रकाराच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. बांगलादेश स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी बांगलादेश दौऱ्यावर होते. मोदी हे भारतातील मुस्लिमांशी भेदभाव करत असल्याचा आरोप करत त्यांच्या दौऱ्याला   विरोध झाला.