फेसबुक वरून आक्षेपार्ह संदेश पाठवल्याप्रकरणी सात युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी पाठवलेले संदेश धार्मिक तेढ निर्माण करणारे होते असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी १५३ बी, २९५ ए ५०४ या भादंवि व माहिती तंत्रज्ञान कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विपुल शहा याने हे संदेश लिहिले होते, त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे. २० जूनला सिंग याने फेसबुकवर पोस्ट केली व सहा युवकांनी ती लाईक केली त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे, असे सहायक पोलीस अधीक्षक दिनेश त्रिपाठी यांनी सांगितले.
स्थानिक बसपा नेते शरीक खान यांनी कोतवाली पोलिस स्टेशनला तक्रार दिली होती, तसेच त्यावेळी त्यांनी फेसबुक पोस्टवर घोषणाबाजी केली होती त्यामुळे तणाव निर्माण झाला. त्यावरून ही कारवाई करण्यात आली. वेगवेगळी पोलिस ठाणी चौकशी करीत असून तपास प्रगतिपथावर आहे असे पोलिसांनी सांगितले.