गेल्या आठवडय़ात तुर्कस्थानमध्ये अटक करण्यात आलेल्या ब्रिटिश जिहादींनी इस्तंबूलमध्ये पॅरिससारख्या हल्ल्याचा कट आखला होता, असा संशय असल्याचे सुरक्षा दलाच्या सूत्रांनी रविवारी सांगितले. आयसिसने महत्त्वाची जबाबदारी सोपवलेल्या आयने लेस्ले डेव्हिड ऊर्फ जिहादी जॉन याला गेल्या आठवडय़ात अटक करण्यात आली होती. डेव्हिड आणि त्याच्या साथीदारांना इस्तंबूलमध्ये पॅरिससारखा हल्ला घडवायचा होता का, याबाबत तपास सुरू आहे. मात्र, पॅरिसमध्ये हल्ला करण्यात आला त्याच दिवशी इस्तंबूलमध्ये हल्ला करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, असा आमचा अंदाज आहे, असे सुरक्षा दलाच्या सूत्रांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 16, 2015 12:22 am