28 February 2021

News Flash

प्रेम प्रकरणाला विरोध करणाऱ्या वडिलांना मुलगी, मुलगा आणि पत्नीनं जिवंत जाळलं!

पीडित व्यक्ती एक गरीब शेतकरी आहे

(संग्रहित छायाचित्र)

मुलीच्या प्रेम प्रकरणाला विरोध दर्शवणाऱ्या वडिलांना मुलगी, मुलगा आणि पत्नीकडून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या घटनेतील सर्व आरोपी फरार असून पीडित व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती गंभीर आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मोहम्मद आमिर (वय ५५) असं पीडित व्यक्तीचं नाव असून ही व्यक्ती आणि त्याचं कुटुंब बदायूं जिल्ह्यातील वजीरगंजच्या हतरा नामक गावात राहतात. आमिर यांच्या कुटुंबात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा आहे. शेती करुन हे कुटुंब आपलं गुजराणं करतं.

दरम्यान, एका अज्ञात व्यक्तीनं पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती कळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी आमिर ५० टक्के जळालेल्या अवस्थेत जमिनीवर पडलेले होते. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पीडित व्यक्तीचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

जबाबात पीडित मोहम्मद आमिर यांनी म्हटलं की, “माझ्या मुलीचे कोणाशी तरी प्रेम संबंध होते. मी याला विरोध केला तर माझा मुलगा-मुलगी, पत्नी आणि भाच्याने माझ्यावर पेट्रोल टाकून पेटवलं, त्या सर्वांना वाटतं की मरावं.” या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस अधीक्षक सिद्धार्थ वर्मा म्हणाले, “आम्हाला याप्रकरणी कोणतीही तक्रार मिळालेली नाही. त्यामुळे अद्याप गुन्ह्याची नोंद झालेली नाही. मात्र, आम्ही आरोपींचा शोध सुरु केला आहे.” डॉक्टरांचं आमिर यांच्या प्रकृतीकडे लक्ष असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशात कालच निर्भयासारखी आणखी एक घटना घडली. बदायूं जिल्ह्यातच घडलेल्या या घटनेत एका ५० वर्षीय महिलेवर सामुहिक बलात्कार करुन अनन्वित अत्याचार करण्यात आले आणि तिची हत्या करण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून उत्तर प्रदेशात महिला अत्याचार आणि इतर गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2021 9:33 am

Web Title: the father who opposed the love affair was burnt alive by his daughter son and wife aau 85
Next Stories
1 अमेरिकेत ट्रम्प समर्थकांकडून हिंसाचार; जो बायडन म्हणाले…’हा विरोध नव्हे देशद्रोह’
2 अमेरिकेत ट्रम्प समर्थकांकडून झालेल्या हिंसाचारावर पंतप्रधान मोदींचे भाष्य; म्हणाले…
3 फेसबुक आणि ट्विटरकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मोठी कारवाई
Just Now!
X