Monsoon session of Parliament from July 19 : संसदेचे यंदाचे पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासून सुरू होणार असून, १३ ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. यामध्ये १९ कामकाजाचे दिवस असणार आहेत. अशी माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली आहे.

संसदीय कामकाज मंत्रिमंडळाच्या समितीने १९ जुलै ते १३ ऑगस्ट दरम्यान संसदेचे पावसाळी अधिवेशन घेण्याची शिफारस केली होती. या अधिवेशनात, सरकार अनेक बिलं सादर करु शकते. या दरम्यान, करोना आणि कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आंदोलनाचा मुद्दा विरोधक उपस्थित करू शकतात.

अधिवेशनात कोविडशी संबंधित सर्व प्रोटोकॉलचे पालन केले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. संसदेत प्रवेश करणाऱ्या सर्वांनी करोना लसीचा किमान एक डोस घेतला असेल, हे तपासल्या जाणार आहे.