08 March 2021

News Flash

तीन कोटींची संपत्ती हडपल्यानंतर तीन मुलांनी जन्मदात्यास रस्त्यावर सोडले

तिन्ही भावंडांविरोधात गुन्हा दाखल; ग्रामस्थ व पोलिसांनी केलेले समुपदेशन निष्फळ

प्रतिकात्मक छायाचित्र

वडिलांची तीन कोटींची संपत्ती हडपल्यानंतर तीन निर्दयी मुलांनी आपल्या वयोवृद्ध जन्मदात्यास रस्त्यावर सोडून दिल्याची संतपाजनक घटना तेलंगणमधील सिद्दीपेट जिल्ह्यातील माधीरा गावात घडली आहे. या प्रकरणी या तिन्ही भावांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, या वृद्ध पित्याची प्रकृती बिघडल्याने ते सध्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर, त्यांच्या निर्दयी मुलांना हुजाराबाद तुरुंगात डांबण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोथू माल्या यांनी आपली मालमत्ता पोथू सुधाकर, पोथू जनार्दन व पोथू रविंदर या आपल्या तिन्ही मुलांच्या नावे करून दिल्यानंतर, त्यांच्या तिन्ही मुलांनी त्यांना रस्त्यावर सोडले. एवढेच नाहीतर निर्दयीपणाचा कळस म्हणजे या मुलांनी आपल्या आईचे सोन्या-चांदीचे दागिणे देखील घेतले. तर, यातील एका मुलाने आईला तिच्या नावावर सहा एकर जमीन असल्याने आपल्या बरोबर राहू देण्यास परवानगी दिली.

आणखी वाचा- …आणि सासरेच जावयाचं कापलेलं मुंडकं घेऊन पोहोचले पोलीस ठाण्यात

पोलिसांनी व महसूल अधिकाऱ्यांनी समुपदेशन करूनही तिन्ही भावडांनी आपल्या वडिलांचा सांभाळ करण्यास नकार दिला. धक्कादायक म्हणजे, त्यांनी त्या ग्रामस्थांनाही धमकवले ज्यांनी त्यांच्या वडिलांना खाण्यास दिले. अखेर ग्रामस्थांनी त्या वृद्धास वृद्धाश्रमात दाखल केले.
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, वृद्धाश्रमात या वृद्ध पित्याची प्रकृती खालवल्यानंतर त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. माधीरा गावच्या महसूल अधिकाऱ्याने या प्रकरणी कोहिडा पोलिसात लिखीत तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी गुन्ह्याची नोंद केली आहे.

आणखी वाचा- धक्कादायक: अपंग मुलीवर सामूहिक बलात्कार; तीन जणं ताब्यात

तिन्ही मुलांनी ते निर्दयी असल्याचे दाखवून दिली आहे. ग्रामस्थ, पोलीस व महसूल अधिकाऱ्याने समुपदेशन केल्यानंतर व समजूत घातल्यानंतरही ते वडिलांचा सांभाळ करण्यास तयार झाले नाही. असे कोहिडा एसआय राज कुमार यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलतना सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2020 9:05 am

Web Title: the three children left their father on the streets after seizing property worth rs 3 crore msr 87
Next Stories
1 केरळमध्ये विमान दुर्घटनेनंतर पुढच्या पाच मिनिटात नेमकं काय घडलं ?
2 बैरूतचा धडा: चेन्नई जवळ असलेला ६९७ टन अमोनियम नायट्रेटचा साठा लावला मार्गी
3 सुन्नी बोर्ड अयोध्येमधील कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री योगींना आमंत्रित करण्याची शक्यता
Just Now!
X