जम्मू- काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी पुन्हा एकदा कलम ३७० च्या मुद्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी सांगितले की, आज काश्मीर घाटीतील तरूणांकडे नोकरी नाही, त्यामुळे त्यांच्या समोर आता शस्त्र उचलण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. आज दहशतवादी कॅम्पमधील भरती वाढत आहे.

मुफ्ती यांनी आरोप केला आहे की, भाजपा जम्मू-काश्मीरची जमिनीची विक्री करू इच्छित आहे. आज बाहेरून येऊन लोकं इथं नोकरी करत आहेत. मात्र आपल्या मुलांना नोकरी मिळत नाही. त्या सध्या जम्मू दौऱ्यावर आहेत. या दरम्यान आयोजित पत्रकारपरिषदेद्वारे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आणखी वाचा- एक वेळ असेल जेव्हा सरकार लोकांसमोर हात जोडून उभं असेल; मेहबुबा मुफ्तींची टीका

यावेळी त्यांनी कलम ३७० वरून मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटले की, हा मुस्लीम व हिंदुंचा विषय नाही. जम्मू-काश्मीर लोकांची ओळख आहे. लोकांना आपल्या भविष्याची चिंता आहे. असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं.

आणखी वाचा- हवं असल्यास फारूख अब्दुल्लांनी पाकिस्तानात जाऊन कलम ३७० लागू करावं : संजय राऊत

या अगोदर देखील मुफ्तींनी सातत्याने कलम ३७० वरून केंद्र सरकारवर निशाणा साधलेला आहे. लोकांचा आवाज दाबून जम्मू काश्मीरमध्ये प्रेशर कुकरसारखी परिस्थिती निर्माण केली होती. एक वेळ अशी येईल जेव्हा सरकार हात जोडून विचारेल की राज्याला विशेष दर्जा पुन्हा देण्याव्यतिरिक्त आणखी काय हवं,” असं मुफ्ती म्हणाल्या होत्या.