स्त्रियांवरील हिंसाचार ही अगदी रोजची बाब होऊन गेली आहे. त्यातही खास करून घरगुती हिंसाचाराला तर जणू सांस्कृतिक मान्यता मिळाली आहे. महिलांना घरगुती हिंसाचाराला मोठय़ा प्रमाणात बळी पडावे लागत असून शारीरिक, भावनिक पातळीवर त्रास देणे, ऑनर किलिंग, हुंडय़ासंदर्भातील हिंसाचार, धार्मिक, लैंगिक मुद्दय़ांवरून कुटुंबातील हिंसाचार यांचा समावेश आहे. महिलांना विविध देशांमध्ये कशी वागणूक मिळते आणि त्यांचा राहणीमानाचा दर्जा कसा आहे, यावर एक सर्वे करण्यात आला आहे. महिलांना राहण्यासाठी सुरक्षित आणि असुरक्षित असणाऱ्या देशांची त्यांनी नावे समोर आली आहे.

२०१९ मधील Nespick ने जगभरातील १०० देशांमध्ये महिलांचा अभ्यास केला आहे. यामध्ये महिलांना मिळणारी वागणूक, राहणीमानाचा दर्जा, शिक्षण, लैंगिक मुद्दय़ांवरून कुटुंबातील हिंसाचार आणि इतर गोष्टींचा अभ्यास केला आहे. यामध्ये महिलांसाठी सुरक्षित आणि सर्वोत्तम देश म्हणून नॉर्वे अव्वल स्थानावर असल्याचे समोर आले आहे. नॉर्वेमध्ये महिलांना समानतेचा दर्जा इतर देशांच्या तुलनेत आधिक दिला जातो. नॉर्वेमध्ये gender pay gap फक्त 7.1 टक्के आहे. नॉर्वेनंतर दुसऱ्या स्थानावर स्विडन आणि कॅनडा या देशांचा क्रमांक लागतो.

महिलांसाठी असुक्षित असणाऱ्या देशांमध्ये नायजेरिया प्रथम क्रमांकावर आहे. नायजेरियामध्ये महिलांवर होणारे अत्याचार, मिळणारे शिक्षण आणि त्यांना मिळणारी वागणूक इतर देशांच्या तुलनेत अतिशय खराब आहे. या यादीत दुसऱ्या स्थानावर इथोपिया आणि तिसऱ्या स्थानावर पाकिस्तानचा क्रमांक लागतो असे या सर्वेमध्ये आढळले आहे.

महिलांसाठी सुरक्षित दहा देश –
1.नॉर्वे
2. स्विडन
3. कॅनडा
4. फिनलँड
5. आईसलँड
6. डेन्मार्क
7.आयरलँड
8. स्लोव्हिनिया
9. ऑस्ट्रेलिया
10. इस्टोनिया
87. भारत

महिलांसाठी असुरक्षित असलेले दहा देश –
1. नायजेरिया
2. इथोपिया
3. पाकिस्तान
4. उगेंडा
5. मोजेम्बिक्यू
6. लाऊस
7. टन्झेनिया
8. कॅमरून
9. इजिप्त
10. रावंडा