News Flash

सरकारला जे लोक आवडत नाहीत, त्यांना दहशतवादी घोषित केलं जाऊ शकतं – अमर्त्य सेन

शेतकरी आंदोलनालाही दिलं समर्थन

सरकारला जे लोक आवडत नाहीत त्यांना दहशतवादी घोषीत केलं जाऊ शकतं तसेच त्यांच्यावर अटकेची कारवाईही होऊ शकते, असं मत नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांनी व्यक्त केलं आहे. ८७ वर्षीय अमर्त्य सेन हे सध्या हार्वर्ड विद्यापीठामध्ये प्राध्यापक आहेत. अमर्त्य सेन यांनी ई-मेलच्या माध्यमातून पीटीआयला मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांनी देशात चर्चा आणि विरोधी विचारांमधील मोकळीक कमी झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

सेन यांनी दावा केला की, “शांततापूर्ण आणि अहिंसक मार्गाने वापर करणारे कन्हैया, खालिद किंवा शेहला सारख्या युवा आणि दूरदृष्टी ठेवणाऱ्या नेत्यांसोबत राजकीय संपत्तीसारखा व्यवहार करण्य़ाऐवजी दडपशाहीप्रमाणे वागणूक दिली जात आहे. उलट त्यांना शांततापूर्ण प्रकारे पुढे जाण्याची संधी द्यायला हवी होती. केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचं समर्थनही सेन यांनी केलं.

नुकतेच, विश्वभारती विद्यापीठाने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला अतिक्रमण करणाऱ्यांची एक यादी पाठवली आहे. या यादीत प्राध्यापक अमर्त्य सेन यांच्या नावाचाही समावेश आहे. विद्यापीठाचं म्हणणं आहे की, विश्व भारतीच्यावतीने सेन यांच्या दिवंगत वडिलांना कायदेशीररित्या भाड्यानं दिली होती.

दरम्यान, सेन यांनी आपण विद्यापीठाच्या कोणत्याही जमिनीवर अतिक्रमण केल्याचा इन्कार केला आहे. याप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील अमर्त्य सेन यांना पाठिंबा दर्शवला असून त्यांच्यावर लावलेल्या आरोपांना बिनबुडाचं म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2020 8:43 pm

Web Title: those who do not like the government can be declared terrorists says amartya sen aau 85
Next Stories
1 शेतकरी आंदोलन सरकारनं अत्यंत गांभीर्यानं घ्यायला हवं, अन्यथा….; शरद पवारांनी दिला इशारा
2 धक्कादायक… Game of Thrones च्या निर्मात्याची हत्या; चहामधून देण्यात आलं विष
3 कर्नाटकमध्ये गोहत्या प्रतिबंधक विधेयक मंजूर, सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद
Just Now!
X