04 June 2020

News Flash

अमेरिकेतील हजारो भारतीयांना करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट

अमेरिकेत ४० लाख भारतीय वास्तव्यास

संग्रहित छायाचित्र

 

अमेरिकेतील अनेक भारतीय लोकांच्या करोना चाचण्या सकारात्मक आल्या असून त्यांच्यातील काहीजणांचा मृत्यूही झाला आहे. अमेरिकेत ४० लाख भारतीय वास्तव्यास असून त्यांच्या पैकी अनेकांना करोनाची लागण झाली आहे.

लागण झालेल्या भारतीय लोकांचा निश्चित आकडा समजलेला नाही, पण खासगी समाजमाध्यम गटांवरून जी माहिती मिळत आहे त्यावरून न्यूयॉर्क व न्यूजर्सीत अनेक भारतीयांचा मृत्यू झाला. दोन राज्यात भारतीय अमेरिकी लोकांची संख्या अधिक असून या राज्यांना करोनाचा मोठा फटका बसला आहे. सोमवारी १ लाख ७० हजार जणांच्या चाचण्या या दोन राज्यात करण्यात आल्या असून या दोन राज्यातील मृतांची संख्या ५७०० आहे.

अनेक भारतीयांची चाचणी सकारात्मक आल्याची माहिती मिळाली असून त्यात अमेरिकन असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियन ओरिजिन या संस्थेच्या माजी अध्यक्षांची चाचणी सकारात्मक आली आहे. भारतीय अमेरिकी पत्रकार ब्रह्म कुचीभोटला यांचा सोमवारी रात्री न्यूयॉर्क रुग्णालयात मृत्यू झाला.

मेरीलँड, व्हर्जिनियात अनेक भारतीयांच्या चाचण्या सकारात्मक आल्या आहेत. सेवा इंटरनॅशनलने तेथे भारतीयांसाठी हेल्पलाइन सुरू केली आहे. भारतीय अमेरिकी लोकांनी ह्य़ूस्टन येथे मृत्यूशी झुंज देणारे आयटी व्यावसायिक रोहन बावडेकर यांच्या मदतीसाठी २,०४,००० डॉलर्स जमा केले आहेत. त्यांची पत्नी व तीन मुले यांना करोनाची लागण झाली आहे.

सिलिकॉन व्हॅलीत भारतीय अमेरिकी आयटी व्यावसायिक अभियंत्यास करोनाची लागण झाली असून त्याच्या कुटुंबातील सर्वाच्या चाचण्या सकारात्मक आल्या आहेत.

ओहिओत मियामी व्हॅली हॉस्पिटलमधील हृदयोपचार केंद्राचे संचालक डॉ. मुकल एस चंद्र यांना व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आले आहे. भारतीय समुदायाने त्यांच्यासाठी बरे झालेल्या कोविड १९ रुग्णांच्या रक्तद्रवाची उपलब्धता करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2020 12:20 am

Web Title: thousands of indians in the united states are exposed to coronary infection abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 चीनमध्ये बळींची संख्या प्रथमच शून्यावर
2 पंतप्रधानांना सोनियांच्या काटकसरीच्या सूचना
3 देशभरात ५०८ नवे रुग्ण पॉझिटिव्ह, करोनाग्रस्तांची संख्या ४७८९, तर १२४ मृत्यू
Just Now!
X