अफगाणिस्तानमधील खैरखाना परिसरातील स्मशानभूमीजवळ तीन स्फोट झाल्याचे वृत्त आहे. अफगाणिस्तानची वृत्त वाहिनी टोलो न्यूजने हे वृत्त दिले आहे. सुरूवातीच्या वृत्तानुसार या स्फोटात किमान १२ जण ठार झाले आहेत. ज्यावेळी हा स्फोट झाला त्यावेळी स्मशानभूमीत सिनेटर एजादयार यांच्या मुलाला दफन केले जात होते.

यापूर्वी २३ मे रोजी अफगाणिस्तानच्या सैन्य शिबिरावर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात १० सैनिक ठार झाले हेाते. अफगाणिस्ताच्या शत्रूंनी शाहवली कोट जिल्ह्यात लष्कराच्या २०५ कोअरवर हा हल्ला केल्याचे अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले होते. यामध्ये १० शूर सैनिक हुतात्मा झाले असून इतर ९ जण जखमी झाल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले होते.