लंडन : ब्रिटनचे नवे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी गृहमंत्री म्हणून प्रीती पटेल यांच्यासह मूळ भारतीय वंशाच्या तिघांचा त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी म्हणून समावेश केला आहे. ब्रिटनचे ‘सर्वात वैविध्यपूर्ण मंत्रिमंडळ’ असे याचे वर्णन केले जात आहे. कुठल्याही जर-तर शिवाय ब्रिटन ३१ ऑक्टोबरला युरोपीय महासंघातून बाहेर पडेल, असा निर्धार जॉन्सन यांनी व्यक्त केला आहे.

राणी एलिझाबेथ यांनी जॉन्सन यांची ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून नेमणूक केल्यानंतर काही तासांतच त्यांनी प्रीती पटेल यांची गृहमंत्रिपदी, आलोक शर्मा यांची आंतरराष्ट्रीय विकास मंत्रिपदी, तर ऋषी सुनाक यांची वित्त विभागाचे प्रमुख मंत्री म्हणून नेमणूक केली. गुरुवारी सकाळी १० डाऊनिंग स्ट्रीट येथे मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली.

आम्ही आमच्या लोकशाहीवरील विश्वास पुनस्र्थापित करू. संसदेने लोकांना वारंवार दिलेली आश्वासने आम्ही पूर्ण करणार असून, कुठल्याही जर-तर शिवाय ३१ ऑक्टोबरला युरोपीय महासंघातून बाहेर पडू, असे पंतप्रधान म्हणून बुधवारी केलेल्या पहिल्याच भाषणात जॉन्सन म्हणाले.

ब्रेग्झिट समर्थन मोहिमेतील जॉन्सन यांच्या सहकारी असलेल्या प्रीती पटेल यांच्याकडे ब्रिटनची सुरक्षा, इमिग्रेशन आणि व्हिसाविषयक धोरणांचा कार्यभार राहणार आहे.

misa bharti attacks pm modi
“…तर पंतप्रधान मोदींसह भाजपा नेत्यांना तुरुंगात टाकू”; मीसा भारती यांचे विधान, भाजपानेही दिलं प्रत्युत्तर; म्हणाले…

Threats from leaders of India Alliance Allegation of Prime Minister Narendra Modi
इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून धमक्या; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप

CM Mamata Banerjee On Attack NIA team
‘एनआयए’च्या पथकावर जमावाचा हल्ला, ममता बॅनर्जी यांनी तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनाच सुनावले, म्हणाल्या, “मध्यरात्री लोकांच्या घरात…”

sheikh hasina
“आधी तुमच्या बायकांच्या साड्या जाळून टाका”, Boycott India मोहिमेवर बांगलादेशच्या पंतप्रधानांचे विरोधकांना आव्हान!