जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार सेक्टरमध्ये शनिवारी संध्याकाळी उशीरा सुरक्षा रक्षकांनी ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. हे दहशतवादी कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार सेक्टरजवळ सीमारेषा पार करून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. लष्कराकडून परिसरात मोठ्या प्रमाणात शोधमोहिम हाती घेण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराच्या जवानांना संध्याकाळी सातच्या सुमारास सीमारेषेजवळ संशयास्पद हालचाल दिसली. त्यानंतर जवानांनी दहशतवाद्यांचा शोध घोण्यासाठी शोधमोहिम सुरू केली. घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांना जवानांनी घेरलं, त्यानंतर दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. यावेळी झालेल्या चकमकीत ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आले.


जम्मू काश्मीरचे पोलीस महानिर्देशक एस.पी वैद यांनी याबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली.