‘टिनटिन’ या हेरगिरी करणाऱ्या मुलाच्या पात्रावर आधारित असलेल्या ‘द शूटिंग स्टार’ या पहिल्या पुस्तकाच्या मुखपृष्ठ डिझाइनला लिलावात विक्रमी २.५ दशलक्ष युरो मिळाले आहेत. टिनटिनची निर्मिती १९४३ मध्ये बेल्जियमचे हेर्ज यांनी केली होती. नंतर त्यात युरोपच्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक  केली होती, असे पेटीस पॅपियर्स हय़ुबर्टी-ब्रेयन या कॉमिक बुक डीलरच्या मॅरिना डेव्हिड यांनी सांगितले.
डेव्हिड यांनी याबाबत अधिक तपशील देण्यास नकार देताना सांगितले, की ‘टिनटिन’चे मुखपृष्ठ डिझाइन विकत घेणाऱ्यात बेल्जियन किंवा फ्रेंच असे कुणीही नाही. यातून कॉमिक पुस्तकांच्या कलेला अजूनही किती मोठी बाजारपेठ आहे हेच दिसून येते. या रंगीत मुखपृष्ठावर टिनटिन हा मुलगा त्याचा विश्वासू कुत्रा स्नोइ याच्याबरोबर चाललेला दिलको आहे व उजाड माळरानातील लाल-पांढरे मशरून व उल्कापाषाणाचा तुकडा अशी पाश्र्वभूमी त्याला आहे, हेर्जने त्याच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १९८३ पर्यंत टिनटिनचे २३० दशलक्ष अल्बम विकले होते व आता त्यांच्या मुखपृष्ठास २.५ दशलक्ष युरो म्हणजे २.९ दशलक्ष डॉलर्स इतकी विक्रमी किंमत आली आहे.
हेर्ज यांनी अल्बमची विक्री सुरू केल्यानंतर गुंतवणूकदार व संग्राहकांनी त्यात गुंतवणूक केली होती त्यामुळे कॉमिक्सला लोक महत्त्व देत होते हे दिसून येते. मे महिन्यात टिनटिनचे दोन पानांतील चित्र पॅरिसमध्ये २.६५ दशलक्ष डॉलरला विकले गेले होते. जूनमध्ये टिनटिनचे १९३२ पासूनचे अवतार चित्रित करणारे पुस्तक ३.२ दशलक्ष अमेरिकी डॉलरला विकले गेले होते. शूटिंग स्टार हा टिनटिनचा हेर्ज यांनी काढलेला दहावा अल्बम होता.
१९३० मध्ये त्यांनी ही मालिका ‘टिनटिन इन द लँड ऑफ सोविएतस’ या नावाने सुरू केली होती. एका खासगी संग्राहकाने टिनटिनच्या शूटिंग स्टार पुस्तकाचे मुखपृष्ठ विक्रीस ठेवले होते. हेर्ज यांच्या कलाकृती त्यांच्या कुटुंबीयांच्या फाऊंडेशनकडे असून, त्यामुळे त्या बाजारात मिळणे ही दुर्मिळ बाब मानली जाते.