अग्रलेख : मै नाचूँ, तू नचा..
दुष्काळ पडला, अवर्षण दिसू लागले की माणसे बाहेर पडतात. व्यंकटेश माडगूळकर त्यास माणसे जगायला बाहेर पडली असे म्हणतात. करपणारी, भेगाळलेली जमीन आणि गुराढोरांची खपाटीला गेलेली पोटे पाहवत नाहीत शेतकऱ्यांस. तेव्हा जगण्यासाठी घराबाहेर पडणे हाच एक मार्ग असतो. दुष्काळात जे शेतकऱ्यांचे होते ते निवडणुकांच्या काळात राजकीय नेत्यांचे होते. कंत्राटे नाहीत, भकास डोक्यांनी बसून राहिलेले कार्यकत्रे, विचारायला कोणी नाही हे मोठे करुण दृश्य असते राजकीय नेत्यांसाठी. तेव्हा जगण्यासाठी बाहेर पडणे आवश्यकच. घरच्या गुराढोरांना वैरण कोण देणार हा दुष्काळकालीन शेतकऱ्यांचा प्रश्न; तर निवडणूक काळात आणि नंतर कार्यकर्त्यांची सुटलेली पोटे भरणार कोण हा राजकीय नेत्यांना पडणारा प्रश्न. दुष्काळात स्थलांतर जसे शेतकरी करतात तसे प्राणीही करतात. या कठीण काळात पाणथळ जागा हा मोठा आसरा. दोन घास खायला मिळण्याची हमी अशाच ठिकाणी मिळू शकते. वाचा सविस्तर 

‘बंगाल टायगर’ ५० वर्षांत नष्ट होण्याची भीती
वातावरणातील बदलामुळे समुद्राची पातळी वाढल्याने सुंदरबनमधील जगातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल नष्ट होण्याची आणि परिणामी ‘बंगाल टायगर’ ही वाघांची प्रजाती येत्या ५० वर्षांत नष्ट होण्याची भीती अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, वाघांच्या आठ प्रजातींपैकी तीन प्रजाती यापूर्वीच नाहीशा झाल्या आहेत. उर्वरित पाच प्रजाती देखील अतिसंकटग्रस्त गटात आहेत. पश्चिम बंगाल आणि बांगलादेशादरम्यान गंगेच्या त्रिभूज प्रदेशाच्या समुद्राकडील बाजूस पसरलेले सुंदरबन हे जगातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल आहे. लुप्तप्राय प्रजातीतील बंगाल वाघांचे ते सर्वात मोठे क्षेत्र आहे. जगभरात केवळ चार हजारच्या जवळपास वाघ जिवंत आहेत.

भोपाळमध्ये दिग्गीराजांचा सामना शिवराजमामांशी?

लोकसभा निवडणुकीत स्वत:च्या पारंपरिक राजगढ मतदारसंघातून लढण्याची माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांची इच्छा होती, पण मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भोपाळ, इंदौर किंवा जबलपूर यापैकी एका मतदारसंघाची निवड करावी, अशी गळ घातली. काँग्रेस पक्षाने भोपाळमधून उमेदवारी जाहीर केली. इच्छा नसतानाही बळेबळेच भोपाळमधून सिंग यांना लढावे लागत आहे. दिग्विजय सिंग यांनी भोपाळचे आव्हान स्वीकारले असले तरी १९८४ नंतर या मतदारसंघात काँग्रेसला कधीच विजय मिळालेला नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भोपाळ लोकसभा मतदारसंघातील आठपैकी तीन जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या.
वाचा सविस्तर

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचे बुधवारी भोपाळमध्ये आगमन झाले. त्यांच्याबरोबर त्यांचे पुत्र व राज्यातील नगरविकास मंत्री जयवर्धन सिंह हे होते. दिग्विजय सिंह हे भोपाळमधून लोकसभा निवडणूक लढणार आहेत.

नागपूर विभागाला जपानी मेंदूज्वरचा विळखा!

नागपूर विभागातील सहा जिल्ह्य़ांमध्ये ‘स्वाईन फ्लू’वर नियंत्रण मिळवणे कठीण जात असतानाच आता जपानी मेंदूज्वरनेही डोके वर काढले आहे. १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०१९ या दोन महिन्यात जपानी मेंदूज्वरच्या २२ रुग्णांची नोंद झाली असून मेडिकलमध्ये उपचारादरम्यान एक मुलगाही दगावला आहे. या आजाराचे रुग्ण वाढल्याने आरोग्य विभागाचे धाबे दणाणले असून त्यांच्या एका चमूने दगावलेल्या रुग्णाच्या गोंदिया जिल्ह्य़ातील गावाचे निरीक्षणही केले आहे वाचा सविस्तर 

(संग्रहित छायाचित्र)

अंगाची काहिली आणि घामाच्या धारा!

राज्यात सर्वच ठिकाणी निरभ्र आकाश तसेच कोरडय़ा हवामानाची स्थिती असल्याने कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम आहे. अनेक ठिकाणी कमाल तापमान ३८ ते ४१ अंश सेल्सिअसवर गेल्याने अंगाची काहिली होत आहे. किमान तापमानातील वाढीमुळे दिवसासह रात्रीही घामाच्या धारा निघत आहेत. तापमानातील वाढ पुढील काही दिवस कायम राहणार आहे. विदर्भामध्ये काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून, कमाल तापमान ४४ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. वाचा सविस्तर