१. Amritsar Railway Accident: रक्ताळलेल्या ‘अच्छे दिना’च्या करुण किंकाळ्याच : शिवसेना
अमृतसरमधील रेल्वे दुर्घटनेवरुन शिवसेनेने मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. अमृतसरच्या रेल्वे रुळांवर जे घडले, त्या रक्ताळलेल्या ‘अच्छे दिना’च्या करुण किंकाळ्याच होत्या. या दुर्घटनेत रावणाची भूमिका करणाऱ्या कलाकाराचाही मृत्यू झाला. पण त्याने अनेकांचे प्राण वाचवले. रावणाने पत्करलेल्या हौतात्म्याची तरी कदर ठेवा, असे शिवसेनेने म्हटले आहे.

वाचा सविस्तर :

२. विजय मल्ल्याची लंडनमधील हवेली जप्त होणार ?
भारतीय बँकांचे ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून विदेशात पसार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्या याच्या लंडनमधील हवेलीवर लवकरच टांच येणार आहे. मल्ल्यासह त्याची आई व मुलगा यांना या हवेलीतून बाहेर काढण्यासाठी स्विस बँकेने न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे मल्ल्या बेघर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.वाचा सविस्तर :

३. ट्वेन्टी-२० विश्वचषकात खेळण्याची संधी हुकल्याची खंत!
गेल्या वर्षी झालेल्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाच्या अंतिम फेरीपर्यंतच्या प्रवासात मोलाचा वाटा उचलूनही यंदा ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी संघात स्थान न मिळाल्यामुळे मी निराश झाली आहे, असे परखड मत भारतीय महिला क्रिकेटपटू पूनम राऊतने व्यक्त केले. वाचा सविस्तर :

४. शालेय विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ
राज्यात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक धोकादायकरीत्या केली जात असल्याचे परिवहन विभागाने केलेल्या कारवाईतून समोर आले आहे. स्कूल बसचालक-मालकांकडून तसेच विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहने नियम मोडत आहेत. एप्रिल २०१७ ते सप्टेंबर २०१८ पर्यंत राज्यात केलेल्या स्कूल बस तपासणीत नऊ हजार स्कूल बस व विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या अवैध वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर कठोर कारवाईचा बडगा उचलण्याऐवजी दंडात्मक कारवाई करण्यावरच समाधान मानले आहे. वाचा सविस्तर :

५. सलग पाचव्या दिवशी पेट्रोल, डिझेल स्वस्त
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या दरात घट झाल्याने सलग पाचव्या दिवशी मुंबईसह देशभरात पेट्रोल व डिझेलच्या दरात कपात करण्यात आली. सोमवारी मुंबईत पेट्रोलचे दर प्रतिलिटर ८६ रुपये ९१ पैसे आणि डिझेलचे दर प्रतिलिटर ७८ रुपये ५४ पैशांवर आले. वाचा सविस्तर :