१. मुंबईच्या लाइफलाइनवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता, सर्व स्थानकांवर हाय अलर्ट
मुंबईतील गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर आगामी तीन महिन्यांत दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा भारताच्या गुप्तचर संघटनांनी दिला आहे. त्या धर्तीवर रेल्वेने सुरक्षाव्यवस्थेत वाढ करत अतिदक्षेचा इशारा जारी केला आहे. लष्कर – ए – तोयबाचे अतिरेकी समुद्रमार्गे मुंबईत घुसण्याची खात्रीलायक माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. वाचा सविस्तर :

२. शहीदांच्या पत्नीचे अश्रू पाहून पाणावले डोळे, महिला मुख्याध्यापिकानं सोनं विकून केली मदत
गुरूवारी १४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे झालेल्या दहशतावादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. पुलवामा येथे सीआरपीएफच्या बसवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यामध्ये ४० हून अधिक जवान शहिद झाले. आठवडाभरापूर्वी झालेल्या या हल्ल्यानंतर अनेक स्तरामधून या शहीदांच्या कुटुंबाना मदत करण्यासाठी लोक पुढे येताना दिसत आहे. वाचा सविस्तर :

३. ‘आयसिस’मधून परतलेल्या ‘त्या’ महिलेस अमेरिकेत प्रवेश नाही
सीरियात आयसिसमध्ये सहभागी झालेल्या अलाबामातील महिलेला तिच्या मुलासह अमेरिकेत परतण्याची परवानगी दिली जाणार नाही, कारण ती महिला अमेरिकेची नागरिक नाही, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.अमेरिकेने केलेल्या दाव्याला सदर महिलेच्या वकिलाने आव्हान दिले आहे. प्रशासनाने हा निर्णय कसा घेतला या बाबत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी सविस्तर तपशील दिला नाही. वाचा सविस्तर :

४. विश्वचषकातून ऑलिम्पिक कोटाच रद्द
पाकिस्तानी नेमबाजांना व्हिसा नाकारल्याच्या कारणास्तव दिल्लीतील विश्वचषक नेमबाजी स्पध्रेमधील १६ जणांचा ऑलिम्पिक कोटाच रद्द करण्यात येत असल्याची घोषणा आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघाचे अध्यक्ष व्लादिमिर लिसिन यांनी केली आहे. वाचा सविस्तर :

५. रणवीर सिंग आणि रणबीर कपूर एकत्र काम करणार ?
बॉलिवूडमधील दोन आघाडीचे कलाकार म्हणजे रणवीर सिंग आणि रणबीर कपूर. परंतु अभिनेत्री दीपिका पदुकोणमुळे या दोघांच्या विशेष चर्चा रंगल्या. कधीकाळी या तिघांमध्ये प्रेमाचा त्रिकोण तयार झाला होता. त्यानंतर दीपिकाने रणवीर सिंगसोबत लग्न केलं. तर रणबीर कपूर सध्या आलिया भट्टला डेट करत आहे. मात्र रणबीर-दीपिका -रणवीर या तिघांमधील तेढ अद्यापही तशीच असल्याचं पाहायला मिळतंय. असं असलं तरी रणवीर आणि रणबीरने एकत्र स्क्रीन शेअर करावी अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. वाचा सविस्तर :