१. कर्तारपूर कॉरिडॉरद्वारे होणार तणाव दूर?; पाकचे अधिकारी भारत भेटीवर
सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कर्तारपूर कॉरिडॉर हा एक भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव दूर करण्याचा मार्ग ठरु शकतो. कारण याप्रकरणी चर्चेसाठी पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांचे एक पथक लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहे. वाचा सविस्तर :

 

२. भारतीय उत्पादनांवर अमेरिकेचे निर्बंध
भारताचा व्यापार अग्रक्रमाचा दर्जा काढून घेण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी ठोस पावले उचलली आहेत. यामुळे भारताकडून अमेरिकेला होणारी ५.६अब्ज डॉलर्सची निर्यात आता करमुक्त राहाणार नाही. भारतीय उत्पादनांवरील या र्निबधाचा मोठा फटका देशातील लघु आणि मध्यम उद्योगांना बसण्याची भीती असली, तरी या निर्णयाची आम्हाला मोठी झळ बसणार नाही, असा निश्चिंत पवित्रा भारताने घेतला आहे. वाचा सविस्तर :

 

३.पाकिस्तानातून हॉकी स्टिक्सची आयात मंदावली!
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील संबंध तणावग्रस्त असल्याचा फटका हॉकी क्षेत्रालाही बसला आहे. सीमारेषेपलीकडून येणाऱ्या वस्तूंवर २०० टक्क्य़ांनी सीमाशुल्क वाढवण्यात आल्याने सचिन या लोकप्रिय हॉकी स्टिक्सची आयात पूर्णपणे मंदावली आहे. वाचा सविस्तर :

४.बालाकोटची कारवाई निर्लष्करी असल्याने मृतांचा आकडा दिला नाही- सीतारामन
बालाकोट येथे भारताने केलेला हवाई हल्ला ही लष्करी कारवाई नव्हती तर ती निर्लष्करी कारवाई होती. पाकिस्तानात गेल्या आठवडय़ात भारतीय हवाई दलाकडून जैश ए महंमदच्या छावणीवर करण्यात आलेल्या हल्ल्यात नागरिकांची कुठलीही हानी झालेली नाही, असे संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. वाचा सविस्तर :

५. Video : ‘Game Of Thrones Season 8’ चा ट्रेलर प्रदर्शित
‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही मालिका आज जगातील सर्वाधिक लोकप्रिय मालिका म्हणून ओळखली जाते. आतापर्यंत या मालिकेचे सात सीझन प्रदर्शित झाले आहे. त्यामुळे या मालिकेच्या आठव्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच या आठव्या सीझनचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. वाचा सविस्तर :