१.सुरेंद्र सिंह हत्या प्रकरण: पाचवा आरोपीही अटकेत
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सुरेंद्र सिंह यांच्या हत्येप्रकरणी पाचवी अटक करण्यात आली आहे. वसीम असे या आरोपीचे नाव आहे अशीही माहिती समोर आली असून तो या गोळीबाराचा मास्टरमाईंड होता असेही समजते आहे. पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा त्याला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी एक पिस्तुलही जप्त केले आहे. वाचा सविस्तर : 


२. ICC World Cup 2019 : विश्वविजेत्यांना आव्हान
चेंडू फेरफार प्रकरणामुळे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटला काळीमा फासणारे स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर विश्वचषकाच्या व्यासपीठावर आपली एकदिवसीय कारकीर्द पुन्हा सुरू करणार आहेत. गतविश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक अभियानाला शनिवारी अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीने प्रारंभ होत आहे. वाचा सविस्तर :


३. राष्ट्रीय महामार्ग ‘स्फोटक’
तारापूर औद्योगिक वसाहतीत वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रियेसाठी लागणाऱ्या हायड्रोजन वायूची वाहतूक नागरिकांसाठी धोकादायक ठरली आहे. काही दिवसांपूर्वी अतिशय धोकादायक अशा हायड्रोजन वायूची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाल्याने बोईसर-चिल्हार रस्त्यावरील वाहतूक काही काळ रोखून ठेवण्यात आली होती. वाचा सविस्तर :

४. शहीद पोलिसांच्या मुलांनाही शिष्यवृत्ती, शेतकऱ्यांना निवृत्तिवेतन!
शहिदांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीत वाढ करताना वीरमरण आलेल्या पोलिसांच्या मुलांचाही या योजनेत समावेश, शेतकरी सन्माननिधी योजनेचा विस्तार, पशुधन रोग निवारणासाठी आर्थिक साह्य़, शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक निवृत्तिवेतन योजना आणि किरकोळ विक्रेत्यांबरोबरच स्वयंरोजगार क्षेत्रातील व्यक्तींना निवृत्तिवेतन; असे अनेक धडाकेबाज निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी घेतले. वाचा सविस्तर : 


५. डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी सहा समित्या कार्यरत
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांसह वैद्यकीय शिक्षण विभाग, विद्यापीठ, महाविद्यालय अशा विविध स्तरांवर सहा समित्या कार्यरत आहेत. प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने वैद्यकीय शिक्षण विभागाचे उपसंचालक डॉ. वाकोडे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यांची समिती स्थापन केली आहे. वाचा सविस्तर :