News Flash

ट्रॅफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्राचा महत्त्वपूर्ण निर्णय

वाहतुकीच्या नियमाचं उल्लंघन केल्यास ट्रॅफिक पोलिसांकडे तुमचा वाहतूक परवाना किंवा मूळ कागदपत्रं सोपवण्याची किंवा दाखवण्याची आता गरज नाही

संग्रहित छायाचित्र

वाहतुकीच्या नियमाचं उल्लंघन केल्यास ट्रॅफिक पोलिसांकडे तुमचा वाहतूक परवाना किंवा मूळ कागदपत्रं सोपवण्याची किंवा दाखवण्याची आता गरज नाही. यासाठी तुमच्या मोबाइलमध्ये असणारी कागदपत्रांची ई-कॉपी पुरेशी आहे. केंद्राने राज्यांमधील वाहतूक विभाग आणि ट्रॅफिक पोलिसांना तपासणी करण्यासाठी मूळ कागदपत्रं घेऊ नका असा आदेश दिला आहे.

माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्यामधील तरतुदींचा उल्लेख करत वाहतूक मंत्रालयाने ट्रॅफिक पोलीस आणि राज्यातील अन्य वाहतूक विभागांना आदेश दिला आहे की, ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि इन्शुरन्स पेपरसारख्या कागदपत्रांची मूळ प्रत तपासणीसाठी घेतली जाऊ नये. डिजीलॉकर (DigiLocker) किंवा एमपरिवहन (mParivahan) अॅपमध्ये असणारी कागदपत्रांची ई-कॉपी दाखवली तरी चालणार आहे. याचा अर्थ ट्रॅफिक पोलीस आपल्याकडील मोबाइलवरुन क्यूआर कोड स्कॅन करत चालक किंवा वाहनाची संपुर्ण माहिती डेटाबेसवरुन मिळवू शकतात. त्यासाठी मूळ कागदपत्रं जप्त करण्याची किंवा घेण्याची गरज नाही.

अनेकदा भरधाव वेगाने गाडी चालवणे, ट्रॅफिक सिग्नल तोडणे तसंच गाडी चालवताना फोनवर बोलणे अशा प्रकरणी ट्रॅफिक पोलीस कारवाई करत कागदपत्रं जप्त करतात. मात्र अनेकदा ही कागदपत्रं पोलिसांकडून हरवली जातात. अशा वेळी आपली कागदपत्रं पुन्हा मिळवण्यासाठी लोकांनी तक्रार करुनही वाहतूक विभाग ती मिळवू शकलेला नाही. केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार, ई डेटाबेसच्या आधारे पोलीस संबंधित वाहन आणि वाहनचालकाची संपूर्ण माहिती मिळवू शकतात. त्यासाठी कागदपत्रांची मूळ प्रत जमा करण्याची काहाही गरज नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2018 10:13 am

Web Title: traffic police cant insist for origincal papers to drivers
Next Stories
1 पाकिस्तानी जेलमधून ३६ वर्षांनी होणार भारतीयाची सुटका
2 मसूद अझहरचा पुतण्या व ‘जैश’चा टॉप कमांडर भारतात, सुरक्षा यंत्रणांना हायअलर्ट
3 दिल्लीत कारची तोडफोड करणारा ‘कावडिया’ सराईत चोरटा, पोलिसांनी केली अटक
Just Now!
X