अहमदाबादेत मोटेरा स्टेडियममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘नमस्ते ट्रम्प’ हा कार्यक्रम आपल्या भाषणांनी गाजवला. ट्रम्प यांनी जग गाजवणाऱ्या भारतातील प्रसिद्ध व्यक्तिंची नावं घेऊन उपस्थित लोकांची मनंही जिंकली. पण, त्यांना यावेळी एक नाव घेता आलं नाही आणि त्यांची दांडी गुल झाली. बरं… आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनंही एक टि्वट करून ट्रम्प यांनी क्लीन बोल्ड केलं.

आपल्या भाषणात ट्रम्प यांनी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यांचे तोंडभरून कौतुक केले. दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांची नावं आली की जगभरात जल्लोष केला जातो” अशा शब्दात ट्रम्प यांनी त्यांचं कौतुक केले. पण हे करत असताना सचिनच्या नावाचा उल्लेख सूचिन असा केला. हाच धागा पकडत आयसीसीनं एक मजेदार टि्वट केलं.

या टि्वटमध्ये आयसीसीनं एक व्हिडिओ शेअर केलाय. त्यात सचिन तेंडुलकरचं नाव (sachin ऐवजी soo-chin) सूचिन असं करून बघितलं. त्यात सूचिनची माहिती कुठेच आढळली नाही. शिवाय सचिनचे अनेक प्रकारे नावही आयसीसीनं टि्वट केले.

ते असे…
Sach-
Such-
Satch-
Sutch-
Sooch-
Anyone know?

अनेक नेटकऱ्यांना या टि्वटला लाइक केलंय आणि त्यावर अनेकांनी भन्नाट रिप्लायही केलाय.