19 January 2021

News Flash

डोनाल्ड ट्रम्प यांची ‘टिवटिव’ कायमची बंद; हिंसाचारानंतर ट्विटरचा मोठा निर्णय

हिंसेला चिथावणी देण्याच्या भीतीमुळे कारवाई

(REUTERS/Leah Millis/File)

अमेरिकेच्या संसदेला घेराव घालत ट्रम्प समर्थकांनी प्रचंड धुडगूस घातला. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प समर्थकांनी केलेल्या भयंकर हिंसाचारानंतर ट्विटरने ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेत हिंसाचाराच्या झालेल्या उद्रेकानंतर आणि भविष्यातही हिंसेला चिथावणी देण्याची भीती व्यक्त करत ट्विटरने ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट बंद केलं आहे.

दोन दिवसांपूर्वी नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन, उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या विजयावर औपचारिक शिक्कामोर्तब करण्याच्या घटनात्मक प्रक्रियेत अडथळा आणण्याच्या उद्देशाने मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांनी ‘कॅपिटॉल’ या संसदेच्या इमारतीमध्ये धुडगूस घातला. ट्रम्प समर्थकांनी संसदेत शिरत प्रचंड हिंसाचार घडवून आणला.

या घटनेनंतर ट्विटरने ट्रम्प यांचे काही ट्विट्स डिलीट केले होते. त्याचबरोबर अकाऊंटही तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर ट्विटरने ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मागच्या काही कालावधीत केलेले ट्विट आणि त्यांच्या संदर्भाची समीक्षा केल्यानंतर त्यांचं ट्विटर अकाऊंट कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हिंसा आणखी भडकावण्याची शक्यता असून, ही कारवाई करण्यात येत असल्याचं ट्विटरकडून सांगण्यात आलं आहे.

ट्विटरच्या या कारवाईमुळे अध्यक्ष ट्रम्प यांची या अकाऊंटवरून सुरू असलेली टिवटिव कायमची थांबली आहे. या कारवाईमुळे ट्रम्प हे अकाऊंट सुरू करू शकणार नाहीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2021 8:11 am

Web Title: twitter permanently suspends donald trumps account over risk of incitement bmh 90
Next Stories
1 सहा राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव
2 वाद न्यायालयातच मिटवू!
3 मोदी यांची सोमवारी सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा
Just Now!
X