22 October 2020

News Flash

लष्कराचे दोन जवान ‘हनीट्रॅप’चे शिकार; फेसबुकवर चॅटिंग केल्याप्रकरणी अटक

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांकडून नियंत्रित हा हनीट्रॅपचा प्रकार असल्याचे लष्कराच्या सुत्रांचे म्हणणे आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या हनीट्रॅपचे शिकार झालेल्या भारतीय लष्कराच्या दोन जवानांना अनोळखी फेसबुक प्रोफाईलशी चॅटिंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. राजस्थान पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

लान्स नाईक रवी वर्मा आणि शिपाई विचित्रा बेहरा अशी अटक करण्यात आलेल्या दोन लष्कराच्या जवानांची नावे आहेत. चॅटिंगद्वारे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना माहिती पुरवल्याप्रकरणी राजस्थान पोलिसांनी त्यांना अटक केली. ‘सीरत’ नावाच्या फेसबूक प्रोफाईलशी या दोन जवानांचा संबंध होता. महिलेचे नावाने सुरु असलेल्या या फेसबुक अकाऊंटवर हे जवान चॅटिंग करीत होते. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांकडून नियंत्रित हा हनीट्रॅपचा प्रकार असल्याचे लष्कराच्या सुत्रांचे म्हणणे आहे.

गुप्तचर यंत्रणा आणि सीआयडीसोबत राजस्थान पोलिसांनी संयुक्त कारवाईद्वारे या दोन जवानांना संबंधीत फेसबुक प्रोफाईसोबत एकाच वेळी चॅटिंग करताना रंगेहाथ अटक केली.

यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना समोर आल्याने भारतीय लष्कराकडून ऑक्टोबर महिन्यांत पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांकडून अशा प्रकारे माहिती काढण्याच्या तंत्राबाबत जवानांना इशारा देण्यात आला होता. यात म्हटले होते की, त्यांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत सोशल मीडियावरुन माहितीची देवाण-घेवाण करु नये. तसेच कोणत्याही बोगस बाबा आणि इन्शुरन्स एजंटपासूनही सावध राहावे. मात्र, याकडे दुर्लक्ष केल्याने राजस्थानच्या पोखरण येथे तैनात असलेल्या एकाच युनिटमधील हे जवान पाकिस्तानच्या जाळ्यात अडकले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2019 9:18 pm

Web Title: two army jawans honey trapped by pakistani spy agencies arrested aau 85
Next Stories
1 MAKE IN INDIA: एअरफोर्स HALकडून विकत घेणार ३०० फायटर आणि ट्रेनर विमाने
2 झारखंड प्रदेश प्रभारींच्या घरी भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक
3 …तर परवानगीशिवाय पाकिस्तानात कर्तारपूरला जाईन, नवज्योत सिंग सिद्धू
Just Now!
X