छत्तीसगडमधील सुकमा येथे एका संयुक्त मोहीमेत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. या अगोदर छत्तीसगडमधील बिजापुर जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा घातपाताचा प्रयत्न जवानांकडून उधळून लावण्यात आला होता.
2 Naxals killed during joint counter-insurgency operation by security forces in Sukma district of Chhattisgarh
— Press Trust of India (@PTI_News) December 12, 2019
नक्षलवाद्यांनी घातपात घडवण्यासाठी पेरून ठेवलेली चार स्फोटकं हस्तगत करण्यात जवनांना यश आले होते. दोन ठिकाणांहून ही स्फोटक हस्तगत करण्यात आली होती. मात्र, एका ठिकाणच्या स्फोटकास निकामी करत असताना स्फोट झाल्याने एक जवान जखमी झाला होता.
छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भाग असलेल्या बस्तर परिसरात सध्या नक्षलविरोधी अभियान जोरदार सुरू आहे. १५ सप्टेंबर रोजी सुकमा जिल्ह्यात जवानांनी चकमकीत तीन नक्षलींचा खात्मा केला होता. त्याच्या एक दिवस अगोदरच बस्तर परिसरात तीन नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले होते.