इस्तंबूलहून लंडनमधील स्टॅनस्टेड विमानतळावर आलेल्या एका २१ वर्षीय युवकाला ब्रिटिश पोलिसांनी अटक केली असून त्याचा परदेशातील दहशतवादी कृत्यांशी संबंध असल्याचा संशय आहे. गेल्या आठवडय़ाभरात सहाव्या संशयिताला अटक करण्यात आली असून तुर्कस्तानातील प्रवाशाचा त्यामध्ये समावेश आहे. तथापि, सदर युवकाचा सीरियातील तिढय़ाशी संबंध असल्याबाबतची माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. यापासून ब्रिटनला कोणताही धोका नाही, असे पोलिसांनी सांगितले. जर्मनमधील स्टुटगार्टहून इस्तंबूलमार्गे स्टॅनस्टेड विमानतळावर हा युवक रविवारी उतरला. विमानतळावर उतरताच त्याला तातडीने अटक करण्यात आली. दहशतवादी कृत्यांची आखणी करणे आणि ती अमलात आणणे यामध्ये त्याचा हात असल्याचा दाट संशय आहे