इस्लामाबाद : पाकव्याप्त काश्मीरमधील नीलम खोऱ्यातील एका इमारतीला हिमनगाचा तडाखा बसला. त्यानंतर १८ तास बर्फाखाली गाडली गेलेली १२ वर्षांची मुलगी आश्चर्यकारकपणे बचावली आहे. या मुलीच्या घरातील अन्य काही जण मात्र बर्फाखाली गाडले गेले.

समीना बिबी असे या मुलीचे नाव असून ती कुटुंबीयांसमवेत नीलम खोऱ्यातील तीन मजली इमारतीमध्ये राहात होती. या इमारतीला हिमनगाचा तडाखा बसला आणि ती पूर्णपणे बर्फाखाली गाडली गेली. मात्र मदतकार्य सुरू असताना ही मुलगी जिवंत असल्याचे आढळले. तिच्या पायाचे हाड मोडल्याचे आणि तोंडातून रक्त येत असल्याचे आढळले. समीना हिला मुझफ्फराबादच्या रुग्णालयात दाखल केले असून तिची प्रकृती हळुहळु सुधारत आहे.