05 March 2021

News Flash

उदयनराजेंना उपराष्ट्रपतींकडून समज

शपथविधीनंतर घोषणाबाजी, राज्यातील तिघांनी घेतली मराठीतून शपथ

फोटो सौजन्य ANI

राज्यसभेच्या नवनियुक्त ४५ सदस्यांना बुधवारी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनात शपथ देण्यात आली. राज्यातील  तिघांनी मराठीतून, रामदास आठवले आणि उदयनराजे भोसले यांनी इंग्रजीतून तर शरद पवार यांनी हिंदीतून शपथ घेतली. शपथ घेतल्यावर जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा दिल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी उदयनराजे यांना समज दिली.

राज्यसभेच्या निवडणुका मार्चमध्ये पार पडल्या. करोनामुळे टाळेबंदी जाहीर झाल्याने १० राज्यांमधील लांबणीवर पडलेल्या निवडणुका गेल्या महिन्यात पार पडल्या. या सर्व नव्या खासदारांचा शपथविधी उपराष्ट्रपती व्यकं य्या नायडू यांच्या दालनात पार पडला. राज्यसभेच्या ६१ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ४३ सदस्य पहिल्यांदाच वरिष्ठ सभागृहाचे सदस्य निवडून आले आहेत.

राज्यातून निवडून आलेल्या फौजिया खान वगळता अन्य सहा सदस्यांनी शपथ घेतली. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि उदयनराजे भोसले यांनी इंग्रजीतून तर शरद पवार यांनी हिंदीतून शपथ घेतली. काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसचे राजीव सातव आणि भाजपचे भागवत कराड यांनी मराठीतून शपथ घेतली.

भाजपचे सदस्य उदयनराजे भोसले यांनी इंग्रजीतून शपथ घेतल्यानंतर घोषणा दिल्यामुळे उपराष्ट्रपती नायडू यांनी त्यांना समज दिली. शपथ घेतल्यानंतर उदयराजे यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा दिल्या. त्यावर, हे राज्यसभेचे सभागृह नव्हे माझे दालन आहे. दालनात घोषणाबाजी करू नये. सभागृहातही घोषणा देण्याची मुभा नसते. शपथ घेताना घोषणा देऊ नका त्याची नोंद होणार नाही, असे नायडू यांनी उदयनराजे यांना समज दिली.

ज्योतिरादित्यांचा दिग्विजयसिंग यांना नमस्कार

मध्य प्रदेशमधील सत्तासंघर्षांत काँग्रेसला रामराम ठोकून भाजपवासी झालेले ज्योतिरादित्य शिंदे यांनीही पहिल्यांदाच राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली. यापूर्वी ते सातत्याने काँग्रेसमधून लोकसभेवर निवडून येत असत. शपथ घेण्यापूर्वी ज्योतिरादित्य यांनी जुने वरिष्ठ सहकारी व मध्य प्रदेशमधील तत्कालीन पक्षांतर्गत विरोधक दिग्विजय सिंह यांना तसेच, राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांना आमने-सामने होत नमस्कार केला. दिग्विजय सिंह यांची राज्यसभेवर फे रनिवड झाली असून त्यांनीही बुधवारी शपथ घेतली. १६ व्या लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे हे पहिल्यांदाच राज्यसभेचे खासदार झाले असून त्यांचाही शपथविधी पार पडला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2020 12:10 am

Web Title: understanding udayan raje from the vice president proclamation after swearing in abn 97
Next Stories
1 ऑक्सफर्डची लस सीरम कंपनी ‘कोविशिल्ड’ नावाने विकणार
2 राजस्थान सत्ता नाट्य : “…तेव्हा तुमच्या पक्षाची देशभर बदनामी झाली होती”
3 भारतात अनेक संधी; अमेरिकन कंपन्यांसाठी गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध : पंतप्रधान मोदी
Just Now!
X