केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला कर्नाटक कारवार येथील अंकोला येथे भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात मंत्री श्रीपाद नाईक यांच्या पत्नी विजया नाईक आणि त्यांचा बॉडीगार्डचा जागीच मृत्यू झाला आहे. तर श्रीपाद नाईक यांच्यावर जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नाईक हे येलापूरहून गोकर्ण येथे जात असताना हा अपघात झाला आहे. पोलिसांनी या अपघातासंदर्भात गुन्हा दाखल केला असून करत अधिक तपास करत आहेत.

केंद्रात मंत्री असलेले ६८ वर्षीय श्रीपाद नाईक हे उत्तर गोव्यातील भाजपचे खासदार आहेत. नाईक यांच्यावर केंद्रात आयुष मंत्रालयाची तसेच संरक्षण राज्यमंत्री पदाची जबाबदारी आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोव्याचे मुख्यंत्री प्रमोद सावंत यांच्याशी संवाद साधत जखमी झालेल्या श्रीपाद नाईक यांच्या उपचारासाठी योग्य ती व्यवस्था करण्यास सांगितले आहे.