केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक म्हणजे भल्यामोठय़ा फाइली, कागदांचे ताव, सचिवांची धावपळ.. असे दृष्य असते. मात्र, लवकरच आता हे चित्र बदलणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत आता किंडलचा वापर केला जाणार आहे. येत्या सहा महिन्यात हा निर्णय राबवला जाणार आहे.  मंत्रिमंडळ बैठकीतील प्रत्येक क्षणांची नोंद किंडलमध्ये असेल. बैठकीनंतर मंत्री व अधिकारी किंडल सचिवालयाकडे जमा करतील. त्यातील संवेदनशील माहिती खोडून काढली जाईल. बैठकीतील निर्णयांची सहजसोप्या पद्धतीने माहिती होण्याबरोबरच गोपनीयता बाळगली जाणे, असा दुहेरी उपयोग किंडलचा केला जाणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.