नागरी हक्कांचा पुरस्कार करणारे दिवंगत नेते जॉन लुईस यांनी मतदानाचा अधिकार व समान अधिकार या नागरी हक्कांसाठी लढा दिला होता. आता अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुका होत असताना हे हक्कच धोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, अशी टीका माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी केला आहे.

लुईस यांच्या अंत्यसंस्कारप्रसंगी ते बोलत होते. ओबामा यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव न घेता परखड टीका केला. वंशवाद आता व्यवस्थेचा  भाग बनू लागल्याने नागरी संघर्ष तीव्र होत आहेत. २०१२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही ट्रम्प प्रशासनाने मतदान हक्क कायद्यात बदल केलेले नाहीत. जॉन लुईस यांचा सन्मान करायचा असेल तर ज्या कायद्यासाठी त्यांनी मरण पत्करण्याची तयारी दर्शवली होती तो प्रत्यक्षात आणावा, असे ओबामा म्हणाले.  या वेळी बुश व बिल क्लिंटन यांचीही भाषणे झाली.