लॉकडाउनला सहावी मुदतवाढ देण्यात आली असून, ती ३१ जुलपर्यंत कायम राहणार आहे. मात्र, या काळात निर्बंध आणखी शिथिल करण्यात आले असून, हा लॉकडाउनच्या परतीच्या प्रवासाचा दुसरा टप्पा असेल. केंद्रीय गृहमंत्रालयाने सोमवारी रात्री लॉकडाउन शिथिलीकरण-२ साठी नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. कॅन्टोन्मेट झोन वगळता शहराच्या अन्य भागांमध्ये अधिकाधिक आर्थिक व्यवहारांना मुभा देण्यात आली आहे.

नव्या टप्प्यात आर्थिक व्यवहारांचा विस्तार केला जाईल. पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकाच वेळी येऊ शकतील, अशी मोठी दुकाने उघडली जाऊ शकतील. केंद्रीय व राज्य सरकारच्या प्रशिक्षण संस्था १५ जुलैपासून सुरू होणार असून त्यासाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात येणार आहे.

काय सुरू आणि काय बंद राहणार?

शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्थानं ३१ जुलैपर्यंत बंद राहणार.

ऑनलाइन डिस्टन्स लर्निंगला परवानगी कायम. चालनाही देणार.

गृहमंत्रालयाच्या परवानगीशिवाय आंतरराष्ट्रीय प्रवासाला मुभा नाही.

मेट्रो आणि रेल्वे सेवा राहणार बंद.

चित्रपटगृहं, जिम, स्विमिंग पूल, पार्क, बार, असेंबली हॉल आणि अशाप्रकारच्या जागांवर बंदी कायम.

सामाजिक / राजकीय / खेळ / धार्मिक कार्य / मनोरंजन / सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी कायम.

कन्टेन्मेंट झोनच्या बाहेर केंद्र आणि राज्य प्रशिक्षण संस्था १५ जुलैपासून कार्यरत ठेवण्याची परवानगी

 

नाईट कर्फ्यू

केंद्र सरकारनं नव्या गाईडलाईन्सप्रमाणे नाईट कर्फ्यू कायम ठेवला आहे. परंतु अत्यावश्यक सेवांच्या परिचालनासाठी परवानगी देण्यात आली आहे.

नाईट कर्फ्यूची वेळही कमी करण्यात आली असून आता ती रात्री १० ते सकाळी ५ पर्यंत असणार आहे.