21 September 2020

News Flash

‘मशीद आवारातील भूमिपूजनाचे आदित्यनाथांना निमंत्रण’

‘आपण योगी व हिंदू असल्याने मशिदीच्या पायाभरणी समारंभास जाणार नाही’

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

लखनऊ : अयोध्येत मशिदीसाठी देण्यात आलेल्या जागेवर सार्वजनिक सुविधांच्या भूमिपूजनासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण देण्यात येईल, असे सुन्नी केंद्रीय वक्फ मंडळाने म्हटले आहे.

‘आपण योगी व हिंदू असल्याने मशिदीच्या पायाभरणी समारंभास जाणार नाही’, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी आधीच म्हटले आहे. अयोध्येतील धन्नीपूर खेडय़ात ही मशीद बांधण्यात येणार आहे. धन्नीपूर येथे पाच एकर जागा मशिदीसाठी देण्याचे राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील आदेशानुसार जाहीर केले आहे. या मशिदीच्या आवारात रुग्णालय, वाचनालय, सामुदायिक स्वयंपाकगृह व संशोधन केंद्र उभारण्यात येणार असून या सगळ्या सुविधा लोकांसाठी असल्याने त्या प्रकल्पांच्या पायाभरणी कार्यक्रमाकरिता योगी आदित्यनाथ यांना निमंत्रित केले जाईल असे इंडो-इस्लाम सांस्कृतिक महासंघाचे सचिव व मशिदीसाठीच्या  विश्वस्त संस्थेचे प्रवक्ते अथर हुसेन यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी पायाभरणी कार्यक्रमात सहभागी तर व्हावेच पण त्या सुविधा उभारण्यात मदतही करावी असे ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2020 2:37 am

Web Title: up cm yogi adityanath invited to lay foundation stone for public facilities on land for mosque in ayodhya zws 70
Next Stories
1 मोदींच्या आवाहनाला राहुल गांधींचा प्रतिसाद; “ते सत्य सांगून या सत्याग्रहाची सुरूवात कराल का?”
2 “पंतप्रधानांनी लक्ष घालावं”; देशात करोनामुळे २०० डॉक्टरांचा मृत्यू
3 अस्वच्छतेविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘भारत छोडो’चा नारा
Just Now!
X