UPSC Civil Services Prelims Exam 2021 Postponed News : देशात सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट निर्माण झालेलं आहे. दिवसेंदिवस मोठ्यासंख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत आहे. शिवाय, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. आता केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) देखील २७ जून रोजी होणारी नागरी सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकली आहे. ही परीक्षा आता १० ऑक्टोबर रोजी होणार आहे.

मागील अनेक दिवसांपासून विद्यार्थी परीक्षा रद्द करण्याची मागणी करत होते. मागील वर्षी देखील करोना संसर्गाच्या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ३१ मे रोजी होणारी परीक्षा स्थगित करण्यात आली होती, त्यानंतर या परीक्षेचे ४ ऑक्टोबर २०२० रोजी आयोजन करण्यात आले होते.

मोठी बातमी! मेडिकलच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय

या संदर्भात यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन देखील टाकण्यात आलं आहे. यूपीएससी नागरी सेवा परीक्षा -२०२१ आणि भारतीय वन सेवा परीक्षा -२०२१ साठी २४ मार्ज पर्यंत अर्ज मागवण्यात आले होते.

दहावीची परीक्षा ‘अधिकृतरीत्या’ रद्द

दरम्यान, राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या घोषणेनंतर बावीस दिवसांनी परीक्षा रद्द के ल्याचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने बुधवारी प्रसिद्ध के ला आहे. त्यामुळे आता दहावीच्या परीक्षा ‘अधिकृतरित्या’ रद्द झाल्या आहेत. दहावीची परीक्षा रद्द के ल्यामुळे गुणपत्रक/प्रमाणपत्र देण्याबाबत, अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत स्वतंत्रपणे निर्देश देण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे.