भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या २+२ चर्चेत अमेरिकेने दाऊद विरोधात सर्च ऑपरेशन राबवण्यास सहमती दर्शवली आहे. या दोन्ही देशांमध्ये झालेल्या चर्चेत दहशतवाद हा मुद्दाही चर्चिला गेला. याच चर्चेत दाऊदला शोधण्यासाठी भारताचे सहकार्य करण्याबाबत अमेरिकेने सहमती दर्शवली आहे. दोन्ही देश दाऊद विरोधात सर्च ऑपरेशन चालवणार आहेत. त्यामुळे दाऊदला जेरबंद करण्यासाठी आता भारताला अमेरिकेची साथ मिळाली मिळाली आहे. सध्याच्या घडीला दाऊद इब्राहिम पाकिस्तानात लपला आहे. मात्र पाकिस्तानने वारंवार दाऊद तिथे असल्याचे वृत्त फेटाळले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९९३ मध्ये झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटात दाऊदचा प्रमुख सहभाग आहे. २००३ मध्ये त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. भारतासोबत अमेरिकेसाठीही दाऊद मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे. अमेरिकेने दाऊदवर २५ लाख डॉलर्सचे बक्षीसही लावले आहे. भारताने केलेल्या प्रयत्नांमुळेच युएई आणि ब्रिटनमधील त्याच्या संपत्तीवर टाच आणण्यास मदत झाली आहे. आता अमेरिकेने दाऊद विरोधात सर्च ऑपरेशन करण्यासाठी भारताची साथ देण्याचे मान्य केल्याने दाऊदच्या मुसक्या आवळल्या जाऊ शकतात.

भारतीय तपास यंत्रणा गेल्या अनेक वर्षांपासून कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या शोधात आहेत. त्यांना आता अमेरिकेची मदत मिळणार आहे. त्यामुळे त्याला जेरबंद करण्यात भारताला यश येऊ शकते. दोन्ही पक्षांनी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात डी कंपनी आणि संबंधित दहशतवादी संघटनांविरोधात २०१७ मध्ये सुरू झालेल्या द्विपक्षीय चर्चेचाही उल्लेखही करण्यात आला आहे. ‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या वृत्तानुसार डी कंपनीत असलेल्या सूत्रांच्या जीवाला धोका असल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर दाऊदची माहिती जाहीर करणे भारतासाठी आव्हानात्मक होते. आता अमेरिकेने दाऊदविरोधात भारताची साथ देण्याचे ठरवल्याने दाऊदबाबतची सगळी माहिती अमेरिकेला दिली जाऊ शकणार आहे.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us agrees to take action against dawood ibrahim and d company affiliates
First published on: 07-09-2018 at 02:29 IST