अमेरिकी अध्यक्षीय उमेदवारीच्या निवडणुकीतील न्यूयॉर्कच्या प्रतिष्ठेच्या लढतीत घरच्या मैदानावर डोनाल्ड ट्रम्प व हिलरी क्लिंटन यांनी विजय मिळवले, त्यामुळे या निवडणुकीत दोघांचा वरचष्मा कायम राहिला आहे.आता त्यांना उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
क्लिंटन व ट्रम्प यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी बेर्नी सँडर्स व टेड क्रूझ यांच्यावर मात केली. उमेदवारीच्या निवडणुकीत त्यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. अध्यक्षीय शर्यतीत त्यांचे वर्चस्व काही पराभवानंतर कमी होत चालले होते, पण आता मात्र अपयशावर त्यांनी मात केली. ट्रम्प यांच्या विजयाचा अर्थ असा की, आता त्यांना न्यूयॉर्कमधील ९५ प्रतिनिधी मते मिळाल्याने जुलत होणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या अधिवेशनातही त्यांना उमेदवारीसाठी फार प्रयत्न करण्याची गरज राहणार नाही. डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी िक्लटन यांनी बेर्नी सँडर्स यांना धक्का दिला असून त्यांना या लढतीत पुढे कायम राहायचे की नाही याचा निर्णय घेण्याइतपत दारूण अवस्था निर्माण झाली आहे.तुम्ही पुन्हा एकदा हे सिद्ध केले आहे की, स्वगृहापेक्षा दुसरे काहीच असू शकत नाही. हा विजय मला व्यक्तिगत वाटतो, असे श्रीमती क्लिंटन यांनी त्यांचे पती बिल िक्लटन व चेलसा यांच्यासमवेत विजयानंतरच्या भाषणात सांगितले. ट्रम्प व क्रूझ यांच्यावर टीका करताना त्या म्हणाल्या की, डोनाल्ड ट्रम्प व क्रूझ यांची देशाविषयीची दृष्टी अगदी चुकीची व विभाजनाला उत्तेजन देणारी आहे. मुस्लिमांना देशात बंदी घालण्यासारखी वक्तव्ये ट्रम्प यांनी केली आहेत. मुस्लिमांना बंदी घालण्याची धमकी देताना व अमेरिकी मुस्लिमांना गुन्हेगार ठरवताना अमेरिकेची जी मूलभूत तत्त्वे आहेत त्यांनाच हरताळ फासला आहे. एकोप्याने राहण्यातच हित आहे, एकमेकांचे पाय ओढण्यात नाही., न्यूयॉर्कच्या लोकांना हे माहिती आहे. सँडर्स यांचा ओझरता उल्लेख करून िक्लटन म्हणाल्या की, एखाद्या प्रश्नाचे केवळ निदान करून भागत नाही. अमेरिका हा प्रश्न सोडवणारा देश आहे. आपण नेहमी अधिक नोकऱ्या निर्माण करण्याचे व लोकांना सन्मानाचे आयुष्य जगायला मिळाले पाहिजे याचे भान ठेवले पाहिजे. िक्लटन या गेली आठ वष्रे न्यूयॉर्कच्या सिनेटर होत्या. िक्लटन यांना ५७.९ टक्के तर सँडर्स यांना ५७.९ टक्के मते मिळाली आहेत. ट्रम्प यांना ६०.५ टक्के तर कॅसिच यांना २५.१ टक्के मते मिळाली आहेत. सँडर्स यांनी सांगितले की, आता ईशान्येकडील राज्ये व अटलांटिक राज्ये यांच्यावर आपली भिस्त आहे.
पुढील आठवड्यात तेथे लढत होत आहे. पुढील आठवड्यात पाच राज्यात निवडणूक होत आहे. आताच्या स्थितीत रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारीसाठी १२३७ प्रतिनिधी मतांची गरज असताना ट्रम्प ८४७, टेड क्रूझ ५५३, जॉन कॅसिच १४८ याप्रमाणे मते आहेत. डेमोक्रॅटिक पक्षात क्लिंटन यांना १९३०, सँडर्स यांना १२२३ मते मिळाली आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारीसाठी २३८३ मते गरजेची आहेत.