24 September 2020

News Flash

चीनला मोठा झटका; टिकटॉकवर बंदी घालणाऱ्या आदेशावर ट्रम्प यांची स्वाक्षरी

दिली ४५ दिवसांची डेडलाईन

काही दिवसांपूर्वी भारतानं सुरक्षेच्या कारणास्तव टिकटॉकसह अन्य काही चीनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अन्य देशांमधूनही अशी मागणी पुढे येत होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकवर बंदी घातली जाणार असल्याचं म्हटलं होतं. यानंतर आता टिकटॉक आणि वी-चॅट या कंपन्यांसोबत करण्यात येणाऱ्या व्यवहारांवरदेखील निर्बंध घालण्यात आले आहेत. तर दुसरीकडे मायक्रोसॉफ्ट किंवा इतर कोणत्याही कंपनीच्या हा व्यवसाय खरेदी न करण्याच्या शक्यतेकडे पाहता त्यांनी देशात टिकटॉकवर बंदी घालण्यासाठी १५ सप्टेंबरची मुदत दिली आहे. यासंदर्भात त्यांनी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरीदेखील केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरूवारी संध्याकाळी चिनी अॅप टिकटॉक आणि वी-चॅटवर ४५ दिवसांच्या आत बंदी घालण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली. यापूर्वी सीनेटनं अमेरिकेतील कर्मचाऱ्यांच्या टिकटॉक वापरण्यावर बंदी घालणाऱ्या आदेशाला मान्यता दिली होती. “टिकटॉकसारख्या अविश्वासू अॅपद्वारे डेटा जमवला जाणं हे देशाच्या सुरक्षेविरोधात आहे,” असं ट्रम्प आदेशावर स्वाक्षरी केल्यानंतर म्हणाले.

चिनी कम्युनिस्ट पक्षावर निशाणा

“डेटा मिळवल्यामुळे चीनच्या कम्युनिस्ट पक्षाला अमेरिकेतील लोकांच्या खासगी आणि मालकीची माहिती मिळते. यामुळे चीन अमेरिकेतील फेडरल कर्मचारी आणि कंत्राटदारांच्या ठिकाणांचा मागोवा घेऊ शकते. इतकंच नाही तर कम्युनिस्ट पक्ष खासगी माहितीचा वापर करून धोका निर्माण करू शकतो आणि कॉर्पोरेट हेरगिरीदेखील करू शकतो,” असं ट्रम्प म्हणाले

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2020 9:13 am

Web Title: us president donald trump issues executive order to address the threat posed by tiktok china app jud 87
Next Stories
1 मशिदीच्या कार्यक्रमासाठी जाणार का?; योगी आदित्यनाथ म्हणतात…
2 “काही विघ्नसंतोषी राजकारण्यांच्या पोटदुखीस अंत नाही”; शिवसेनेचा ओवेसींवर निशाणा
3 चिनी ‘अतिक्रमणाची’ कबुली देणारा दस्तऐवज नाहीसा
Just Now!
X