News Flash

Namaste Trump : ट्रम्प दाम्पत्याची ताजमहलला, डायना बेंचवर बसून फोटोसेशन

Donald Trump India tour : अहमदाबादहून आग्राकडे रवाना होणार

Donald Trump India tour अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या पहिल्या भारत दौऱ्यावर दाखल झाले आहेत. सकाळी ११.४० च्या सुमारास अहमदाबाद विमानतळावर त्यांचं आगमन झालं. त्यांच्या स्वगतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. ट्रम्प यांच्याबरोबर त्यांची पत्नी मेलेनिया, मुलगी इवांका, जावई जेअर्ड कुशनर यांच्यासह त्यांच्या सरकारीमधील उच्चपदस्थांचा शिष्टमंडळात समावेश आहे. ट्रम्प यांनी आधी साबरमती आश्रमाला भेट दिली. त्यानंतर मोटेरा स्टेडियममधील ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमात हजेरी लावली. भारतानं दाखवलेल्या प्रेमाबद्दल आभारी आहे, हा क्षण आमच्या आयुष्यभर लक्षात राहील, असंही ट्रम्प यांनी यावेळी म्हटलं. यावेळी, ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचंही तोंड भरून कौतुक केलं. शिवाय भारत-अमेरिका संबंधावरही भाष्य केलं. अहमदाबाद मधील कार्यक्रमानंतर ट्रम्प आग्र्याला गेले. त्यांनी तेथे ताजमहलला भेट दिली आणि तेथे फोटोसेशनही केलं. काही वेळानं ते दिल्लीसाठी रवाना होतील…ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याचं संपूर्ण लाइव्ह कव्हरेज इथं तुम्हाला मिळणार आहे…

 

Live Blog
Highlights
 • 17:30 (IST)

  डायना बेंचवर बसून ट्रम्प दाम्पत्याचे फोटोसेशन

  ताजमहलमध्ये 'डायना बेंच' म्हणून प्रसिद्ध असलेल्या संगमरवरी बेंचवर बसून डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया यांनी फोटोसेशनही केले. हा बेंच फोटो काढण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी बसून आतापर्यंत अनेकांनी फोटोही काढले आहेत. 

  #WATCH US President Donald Trump and First Lady Melania Trump at the Taj Mahal in Agra. pic.twitter.com/hoPx0M8kAd

 • 16:45 (IST)

  ट्रम्प आग्रा येथे दाखल; योगींनी केलं स्वागत

  अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडिअममध्ये झालेल्या नमस्ते ट्रम्प कार्यक्रमानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आग्राला रवाना झाले होते. काही वेळापूर्वी ट्रम्प आग्रा येथे दाखल झाले. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्रम्प यांचं स्वागत केलं. 

17:30 (IST)24 Feb 2020
डायना बेंचवर बसून ट्रम्प दाम्पत्याचे फोटोसेशन

ताजमहलमध्ये 'डायना बेंच' म्हणून प्रसिद्ध असलेल्या संगमरवरी बेंचवर बसून डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया यांनी फोटोसेशनही केले. हा बेंच फोटो काढण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी बसून आतापर्यंत अनेकांनी फोटोही काढले आहेत. 

#WATCH US President Donald Trump and First Lady Melania Trump at the Taj Mahal in Agra. pic.twitter.com/hoPx0M8kAd

17:23 (IST)24 Feb 2020
ट्रम्प यांनी ताजमहल येथील व्हिजिटर्स बुकमध्ये नोंदवला आपला अभिप्राय

17:20 (IST)24 Feb 2020
ट्रम्प-मेलेनिया यांची ताजमहलला भेट
16:45 (IST)24 Feb 2020
ट्रम्प आग्रा येथे दाखल; योगींनी केलं स्वागत

अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडिअममध्ये झालेल्या नमस्ते ट्रम्प कार्यक्रमानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आग्राला रवाना झाले होते. काही वेळापूर्वी ट्रम्प आग्रा येथे दाखल झाले. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्रम्प यांचं स्वागत केलं. 

14:45 (IST)24 Feb 2020
भाषणानंतर ट्रम्प यांनी केलं हिंदीत ट्विट
14:43 (IST)24 Feb 2020
जगातील सर्वात मोठी हेल्थ इन्शुरन्स स्कीम भारतात - मोदी

जगातील सर्वात मोठं स्टेडियमचं नव्हे तर हेल्थ इन्शुरन्स स्कीमही भारतातच चालू आहे. भारतामध्ये जगातील सर्वात मोठं सोलरपार्कसह सर्वात मोठं सेनीटेशन प्रोग्रामही चालू आहे.

14:42 (IST)24 Feb 2020
मोदींनी सांगितली आजच्या युवकांची ओळख

आज १३० कोटी भारतीय मिळून नव्या भारताचं निर्माण करत आहेत. आपली युवा शक्ती आकांशांनी भरलेली आहे. मोठं लक्ष ठेवण आणि ते पूर्ण करणं, ही आजच्या युवकांची ओळखं आहे. - मोदी

14:40 (IST)24 Feb 2020
मेरिका आणि भारतामध्ये विश्वास आणखी मजबूत झालाय - मोदी

व्हाइट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली जाते. त्यावेळी ट्रम्पही त्यामध्ये सहभागी होतात. अमेरिका आज भारताचा सर्वात विश्वासू जोडीदार झाला आहे. मी अमेरिका आणि भारतामध्ये विश्वास आणखी मजबूत होताना पाहिलं आहे. त्याचंच एक उदाहरण म्हणजे. भारताचे लष्कर अमेरिकेच्या लष्कराबरोबर युद्ध सराव करते.

14:36 (IST)24 Feb 2020
भारताचा मित्र - मोदी

ज्यावेळी मी वाशिंगटनमध्ये पहिल्यांदा गेलो होते. त्यावेळी ट्रम्प यांना भेटलो होतो. त्यावेळी व्हाइट हाऊसमध्ये आमची भेट झाली होती. ते म्हणाले होते की, यावेळी ते म्हणाले होते की, मी भारताचा सर्वात चांगला मित्र आहे.

14:34 (IST)24 Feb 2020
ट्रम्प यांनी भारताचा गौरव आणखी वाढवला - मोदी

ट्रम्प यांच्या भाषणानंतर मोदी यांनी पुन्हा एकदा जनतेला संबोधन केलं. यावेळी ते म्हणाले की ट्रम्प यांनी भारताचा गौरव आणखी वाढवला.

14:31 (IST)24 Feb 2020
गॉड ब्लेस इंडिया, गॉड ब्लेस अमेरिका, वी लव यू इंडिया

भारतानं दाखवलेल्या प्रेमाबद्दल आभारी आहे, हा क्षण आमच्या आयुष्यभर लक्षात राहील. गॉड ब्लेस इंडिया, गॉड ब्लेस अमेरिका, वी लव यू इंडिया, असे भाषणाच्या अखेरीस ट्रम्प म्हणाले.

14:27 (IST)24 Feb 2020
दोन्ही देशांमधील संबंध आणखी मजबूत करू - ट्रम्प

येथून ताजमहाल पाहण्यासाटी आम्ही आग्र्याकडे रवाना होणार आहे. त्यानंतर दिल्लीमध्ये उद्या दोन्ही देशांमधील संबंधाला आणखी मजबूत करण्यासाठी चर्चा करणार आहोत. भारत आणि अमेरिका यांच्यातील आर्थिक संबंध आणखी मजबूत करण्यासाठी मोदींसोबत चर्चा करेन

14:24 (IST)24 Feb 2020
ट्रम्प यांचा पाकिस्तानला इशारा

दहशतवादापासून नागरिकांना वाचवण्यासाठी आम्ही दोघे मिळून एकत्र काम करू. आम्ही पाकिस्तानसोबत मिळून सीमेपलीकडील दहशतवाद संपवण्याचा प्रय्तन करू - ट्रम्प यांचा पाकिस्तानला इशारा

14:23 (IST)24 Feb 2020
महात्मा गांधीजींचा सन्मान - ट्रम्प

आम्ही महात्मा गांधीजींचा सन्मान करतो. उद्या दिल्लीमध्ये राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण करेल - ट्रम्प

14:22 (IST)24 Feb 2020
ट्रम्पकडून मोदींचं कौतुक

गावांगावांत वीज पोहचवणं हे मोदींचं मोठं यश आहे.

14:21 (IST)24 Feb 2020
दोन्ही देशांत इतकी मैत्री दृढ नव्हती. - ट्रम्प

प्रत्येक अमेरिकन नागरिक भारतीयांना पसंत आणि प्रेम करतोय. भारत आणि अमेरिकेची मैत्री आजपर्यंतची सर्वात दृढ मैत्री आहे. याआधी दोन्ही देशांत इतकी मैत्री दृढ नव्हती.

14:18 (IST)24 Feb 2020
व्यापराबद्दल बोलताना गुजरातचा उल्लेख

व्यापाराबद्दल बोलताना ट्रम्प यांनी गुजरातच्या योगदानाचा ट्रम्प यांनी  उल्लेख केला.

14:16 (IST)24 Feb 2020
भारतामध्ये विविधतेत एकता - ट्रम्प

ट्रम्प यांनी दिवाळी आणि होळी या भारतीय सणांचा उल्लेख केला. भारतामध्ये विविधतेत एकता आहे. येथील लोक जगात एक उदाहरण आहेत.

14:14 (IST)24 Feb 2020
ट्रम्प यांच्या भाषणात विराट-सचिनचा उल्लेख

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भाषणांमध्ये बॉलिवूड चित्रपट, कलाकार आणि क्रिकेटच्या खेळाडूंचा उल्लेख केला. शाहरूख खानचा दिलवाले दुलहनियां ले जाएंगे या चित्रपटाचा उल्लेख केलाय. तर सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांचाही उल्लेख केला. यासोबतच ट्रम्प यांनी आपल्या भाषणात भांगडा डान्सचाही उल्लेख केला.

14:11 (IST)24 Feb 2020
मोदींच्या नेतृत्वामुळे भारत गरीबीतून बाहेर निघतोय - ट्रम्प

मोदी यांनी चहावाला ते भारताचा पंतप्रधान असा प्रवास केलाय. मोदी म्हणजे कठोर कष्टाचं आणि मेहनतीचं उदाहरण आहे. मोदींच्या नेतृत्वात भारत वेगानं पुढे जातोय. मोदींच्या नेतृत्वामुळे भारत गरीबीतून बाहेर पडतोय. मोदींच्या गॅस योजनेमुळे सर्वसामान्यांच्या घरातही गॅसवर स्वयंपाक तयार केला जातोय. - ट्रम्प

14:07 (IST)24 Feb 2020
मोटेरा भव्यदिव्य - ट्रम्प

मोटेरा स्टेडियम खूपच भव्यदिव्य आहे. जगातील सर्वात मोठं मैदान असून खूपच सुंदर आहे.

14:06 (IST)24 Feb 2020
सन्मानाने भाराहून गेलो - ट्रम्प

तुम्ही आज दिलेला सन्मानाने भाराहून गेलो आहे. हा सन्मान प्रत्येक अमेरिकन नागरिकांच्या ह्रदयात राहिल - ट्रम्प.

14:04 (IST)24 Feb 2020
मोदी माझे चांगले मित्र - ट्रम्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र आहेत. भारतामध्ये सर्वजण मोदींना प्रेम करतात

14:02 (IST)24 Feb 2020
अमेरिका भारताचा खरा मित्र - ट्रम्प

भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधावर बोलताना ट्रम्प म्हणाले की, अमेरिका भारताचा खरा मित्र आहे. तसेच अमिरेका नेहमीच भारताचा सन्मान करत आलेला आहे.

14:01 (IST)24 Feb 2020
आमच्या ह्रदयात भारताचे विषेश स्थान - ट्रम्प

आमच्या ह्रदयात भारताचे विषेश स्थान आहे. अमेरिकेला भारताचा आदर वाटतो. माझ्या स्वागताने भाराहून गेलो. - ट्रम्प

13:58 (IST)24 Feb 2020
मोदी ग्रेट चँपियन ऑफ इंडिया - ट्रम्प

ट्रम्प यांनी नमस्ते म्हणत आपल्या भाषणाला सुरूवात केली. यावेळी त्यांनी 'मोदी ग्रेट चँपियन ऑफ इंडिया, ते माझे खरे मित्र आहेत' असं म्हणतं मोदी यांचं कौतुक केलं.

13:55 (IST)24 Feb 2020
ट्रम्प प्रकाशझोतापासून दूर राहतात - मोदी

भारत-अमिरेकेत विविधतेत एकता आहे . ट्रम्प प्रकाशझोतापासून दूर राहतात. ट्रम्प यांचा हा भारत दौरा दोन्ही देशांच्या मैत्रीसाठी नवा अध्यय असेल - मोदी 

13:55 (IST)24 Feb 2020
नमस्तेचा अर्थ

या कार्यक्रमाचं नाव नमस्ते आहे. याचा अर्थ खूप खोलवर आहे. जगातील प्राचीन भाषा संस्कृतमधील हा शब्द आहे. - मोदी

13:52 (IST)24 Feb 2020
भारत आणि अमिरेकेचे संबंध दृढ

कधी नव्हे ते भारत आणि अमिरेकेचे संबंध इतके दृढ झाले आहेत. - मोदी

13:51 (IST)24 Feb 2020
गुजरातसह अन्य राज्याचे आभार - मोदी

गुजरातसह अन्य राज्यांचे मोदींनी मानले आभार 

13:50 (IST)24 Feb 2020
ट्रम्प यांच्या स्वागताचा जोश साऱ्या देशात- मोदी

ट्रम्प मोठ्या प्रवासानंतरही थकले नाहीत. अहमदाबाद विमानतळाहून थेट साबरमती आश्रमाला भेट देण्यासाठी गेले. त्यानंतर मोटेरा स्टेडियममध्ये पोहचले आहेत. ट्रम्प यांच्या स्वागताचा जोश साऱ्या देशात आहे. - पंतप्रधान मोदी

13:45 (IST)24 Feb 2020
मोदींच्या भाषणाला सुरूवात

भारत माता की जय..म्हणत मोदी यांनी भाषणाला सुरूवात केली . यावेळी नमस्ते ट्रम्प म्हणते मोदी यांनी ट्रम्प यांचं स्वागत केलं

13:45 (IST)24 Feb 2020
मोदींच्या भाषणाला सुरूवात

भारत माता की जय..म्हणत मोदी यांनी भाषणाला सुरूवात केली . यावेळी नमस्ते ट्रम्प म्हणते मोदी यांनी ट्रम्प यांचं स्वागत केलं

13:33 (IST)24 Feb 2020
आजवर ट्रम्प-मोदी इतक्यांदा भेटी

13:28 (IST)24 Feb 2020
अमित शाह यांची उपस्थिती

गृहमंत्री अमित शाह यांची मोटेरा स्टेडियममध्ये हजेरी लावली आहे. मोदी यांनी शाह यांची ट्रम्प यांच्याशी परिचय  करुन दिला.

13:21 (IST)24 Feb 2020
ट्रम्प यांचा ताफा मोटेरा स्टेडियममध्ये दाखल

डोनाल्ड ट्रम्प यांचा ताफा मोटेरा स्टेडियममध्ये दाखल झाला आहे. थोड्याच वेळात नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.

13:19 (IST)24 Feb 2020
भारत माता की जय च्या घोषणा

मोटेरा स्टेडियममध्ये लोकांची गर्दी झाली आहे. स्टेडियममधील लोकांच्या 'भारत माता की जय'च्या घोषणांनी स्टेडियम दुमदुले आहे. थोड्याच वेळात येथे ट्रम्प यांचं आगमन होणार आहे

13:11 (IST)24 Feb 2020
धन्यवाद मोदीजी, अविस्मरणीय भेट - ट्रम्प

'माझे जिवलग मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार, अविस्मरणीय भेट' असा मेसेज डोनाल्ड ट्रम्प यांनी साबरमती आश्रमातील अभिप्राय नोंदवहित लिहिला आहे.

13:03 (IST)24 Feb 2020
ट्रम्प यांच्या पत्नी आणि मुलीबद्दल भारतीयांना उत्सुकता; हे आहेत सर्वाधिक Search केलेले प्रश्न
12:55 (IST)24 Feb 2020
ट्रम्प मोटेरा स्टेडियमकडे रवाना

डोनाल्ड ट्रम्प मोटेरा स्टेडियमकडे रवाना झाले आहेत. १ वाजून पाच मिनिटांनी नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमाला सुरूवात होणार आहे. लाखोंच्या संख्येनं लोकांनी हजेरी लावली आहे. 

12:49 (IST)24 Feb 2020
ट्रम्प यांचा ताफा मोटेरा मैदानाकडे रवाना

ट्रम्प यांचा ताफा साबरमती आश्रमाकडून मोटेरा स्टेडियमकडे निघाला आहे.  येथे नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 

12:46 (IST)24 Feb 2020
ट्रम्प यांनी लिहिला खास संदेश

साबरमती आश्रमातील अभिप्राय नोंद वहित डोनाल्ड ट्रम्प यांनी लिहिला अभिप्राय

12:40 (IST)24 Feb 2020
ट्रम्प यांनी चालवला चरखा

साबरमती आश्रमात डॉनल्ड ट्रम्प यांनी पत्नी मेलानियासोबत चरखा चालवला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. चरख्याची माहिती ऐकताना ट्रम्प खूप उत्सही दिसत होते. 

12:34 (IST)24 Feb 2020
ट्रम्प यांचं साबरमती आश्रमात आगमन झालं आहे.

ट्रम्प यांचं साबरमती आश्रमात आगमन झालं आहे. यावेळी त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते.

12:24 (IST)24 Feb 2020
नागरिकांची गर्दी

ट्रम्प यांचा ताफा विमानतळाकडून साबरमती गांधी आश्रमाकडे रवाना झाला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नागरिकांची गर्दी पहायला मिळत आहे.

12:15 (IST)24 Feb 2020
साबरमती आश्रमाच्या दिशेनं रवाना

ट्रम्प कुटुंबीयांचं अहमदाबाद विमानतळावर शंखनादासह स्वागत करण्यात आलं.  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प, मुलगी इवांका आणि पंतप्रधान मोदी यांचा ताफा साबरमती आश्रमाच्या दिशेनं रवाना झाला आहे. 

12:02 (IST)24 Feb 2020
मोदींनी घेतली गळाभेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प कुटुंबियांचं अहमदाबाद विमानतळावर स्वागत केलं. यावेळी मोदी यांनी ट्रम्प यांची गळाभेट घेतली. 

11:59 (IST)24 Feb 2020
ट्रम्प यांचं अहमदाबाद विमानतळावर आगमन

11:42 (IST)24 Feb 2020
डोनाल्ड ट्रम्प यांचं भारतात आमगन, मोदींनी केलं ट्विट

अमेरिकेचं राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं अहमदाबाद विमानतळावर आगमन झालं आहे. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी आणि पत्नीही आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिथि देवो भव: म्हणत ट्रम्प यांचं स्वागत केलं आहे.

11:33 (IST)24 Feb 2020
रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी

ट्रम्प यांच्या स्वागतासाठी एअरपोर्ट सर्कल बाहेरील गर्दी. ट्रम्प आणि मोदींचा ताफा पाहण्यासाठी स्थानिकांची गर्दी

Next Stories
1 समर्थक-विरोधकांची एकमेकांवर दगडफेक
2 अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आजपासून भारतभेटीवर
3 चीनमध्ये करोना बळी २५०० वर
Just Now!
X