अमेरिकेत दर तासाला २६०० लोकांना करोनाची बाधा होते आहे अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आत्तापर्यंत अमेरिकेतली करोना रुग्णांची संख्या ४० लाखापर्यंत गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वाढ होते आहे. २१ जानेवारीपासून या देशात करोनचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर गेल्या १०० पेक्षा जास्त दिवसांमध्ये करोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत.

पहिल्या ९८ दिवसांपर्यंत अमेरिकेत १० लाख करोना केसेस आढळून आल्या. त्यानंतरच्या ४३ दिवसांमध्ये ही संख्या २० लाखांवर गेली. मागील २७ दिवसांमध्ये हे प्रमाण ३० लाकांवर गेल्या. मागील १६ दिवसांमध्ये ही संख्या ४० लाखांवर गेली आहे. सध्याच्या घडीला अमेरिकेत दर मिनिटाला ४३ जणाना करोनाची लागण होते आहे. न्यूज १८ ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

सुरुवातीला करोना व्हायरस हा प्रकार राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फारसा गांभीर्याने घेतला नव्हता. त्यांनी या व्हायरसला चायना व्हायरस वगैरे अशी नावंही ठेवली. तसंच सातत्याने या मुद्द्यावरुन चीनवर टीकाही केली. मात्र आता त्यांनी त्यांचा सूर बदलला आहे. देशातली करोनाची स्थिती त्यांना ठाऊक आहे म्हणूनच त्यांनीही मास्क वापरण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मास्क वापरण्याचं आवाहन जनतेला केलं आहे. अमेरिकेत सध्याच्या घडीला मिनिटाला ४३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत.