अमेरिकेत दिवसागणिक करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. जगात सर्वात जास्त मृत्यू आणि करोनाबाधित रुग्ण अमेरिकेत आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत अमेरिकेत ६७ हजार ६३२ नवीन करोनाबाधित रुग्ण आढून आले आहेत.

मागील दहा दिवसांपासून अमेरिकेत दररोज ५५ ते ६५ हजार नवीन रुग्ण आढळून येत होते. आता गेल्या २४ तासांत आढळलेल्या रुग्णांने एका दिवसांतील सर्वाधिक करोनाबाधित रुग्णांचा विक्रम मोडीत काढला आहे.

वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत आतापर्यंत ३६ लाख १६ हजार ७४७ जण करोनाबाधित झाले आहेत. एक लाख ४० हजार अमेरिकन नागरिकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे १६ लाख ४५ हजार जणांनी करोनावर मात केली आहे. अमेरिकेतील वाढती करोनाबाधित रुग्णांची संख्या चिंतेत भर घालणारी आहे.