उत्तराखंडमध्ये सरकार स्थापन करायचे की नव्याने जनतेचा कौल घ्यायचा याबाबत राज्याच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, असे भाजपने स्पष्ट केले आहे. याबाबत भाजप नेत्यांची परस्परविरोधी विधाने येत असल्याच्या पाश्र्वभूमीवर प्रवक्ते अनिल बलुनी याबाबतची भूमिका स्पष्ट केली.
काँग्रेसमधील बंडाळीनंतर राज्यात २७ मार्च रोजी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. राज्यात अस्थिरता येण्यास माजी मुख्यमंत्री हरीश रावत जबाबदार असल्याचा आरोप बलुनी यांनी केला. आमदारांना आपल्या बाजूने घेण्यासाठी रावत यांनी कशी खेळी केली, हे स्टिंगद्वारे देशाने पाहिले, असा दावा बलुनी यांनी केला. राज्याचे नाव त्यामुळे बदनाम झाल्याचा आरोपही बलुनी यांनी केला.